----------------
डेटा एन्ट्री ऑपरेटरची नियुक्ती करण्याची मागणी
आगर : नवथळ ग्रुप ग्रामपंचायतमध्ये अनेक दिवसांपासून संगणक आले आहेत. मात्र संगणक चालविण्यासाठी डेटा एन्ट्री ऑपरेटर नसल्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. गावातील सुशिक्षित बेराेजगार युवकांची डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
-----------------
राजुरा सराेदे ते अकाेली रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
जामठी बु. : राजुरा सराेदे ते अकाेली जहाॅंगीरदरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर जागाेजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
--------------------
मंचनपूर ग्रामपंचायत अविराेध निश्चित
अकाेट : तालुक्यातील मंचनपूर ग्रामपंचायतची अविराेध झाली आहे. ग्रामपंचायतमधील सातही उमेदवारांची अविराेध निवड झाली असून, ग्रा. पं. अविराेध हाेण्यासाठी ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले. यामुळे गावविकासाला चालना मिळणार असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
----------------
माेकाट श्वानांचा बंदाेबस्त करण्याची मागणी
पातूर : येथील पातूर-बाळापूर मार्गावर टीकेव्ही चाैक ते खानापूर राेड, बसस्थानक तसेच चाैकाचाैकांत माेकाट श्वानांचा संचार वाढला आहे. श्वानांनी चावा घेतल्याच्या घटनाही वाढल्या आहेत. पातूर नगर परिषद व शिर्ला ग्रामपंचायतने माेकाट श्वानांचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
--------------
मनब्दा ग्रा. पं. निवडणुकीत पाच सदस्य अविराेध
तेल्हारा : तालुक्यातील मनब्दा ग्रामपंचायतच्या पाच उमेदवारांची निवड अविराेध झाली आहे. आता उर्वरित चार जागांसाठी मतदान हाेणार आहे. काही वाॅर्डात अटी-तटीची, तर काही वाॅर्डात चुरशीची लढत हाेणार आहे.
---------------------
महिला जागृती आराेग्य अभियान
बाळापूर : बाळापूर नगर परिषद, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला जागृती आराेग्य अभियान राबविण्यात आले. महिलांना सकस, संतुलित आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय बाळापूर येथे महिलांची आराेग्य तपासणी करण्यात आली.