प्रतिबंधात्मक उपाय, हीच सुरक्षेची ढाल
कोरोनापासून बचावासाठी प्रतीबंधात्मक उपाय हेच महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोविड संसर्गापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नियमित मास्कचा वापर करणे, इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे तसेच वारंवार हात स्वच्छ धुणे आदी उपाययोजना करण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले.
ज्येष्ठांसह दुर्धर आजारी व्यक्तींंनी घ्यावी काळजी
कोरोनाचा वाढता फैलाव आणि वातावरणातील बदलांमुळे ज्येष्ठांसह दुर्धर आजारी व्यक्तींना विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यामुळे या घटकातील व्यक्तींंनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याची गरज आहे. तसेच इतरांपासूनही त्यांनी सुरक्षित अंतर ठेवण्याची गरज आहे.
लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
अनेकांना कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला किंवा ताप असू शकतो, असा अनेकांचा गैरसमज असू शकतो. परिणामी अनेक जण याकडे दुर्लक्ष करून कोविड चाचणी टाळतात. मात्र, उशिरा उपचारामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न करता नागरिकांनी कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहनदेखील आराेग्य विभागाकडून करण्यात येत आहे.