फाेटाे
....................
बारा बलुतेदारांना आर्थिक सहाय्य करा
अकाेला :
भारतीय जनता पक्ष ओबीसी आघाडीच्यावतीने आज रोजी भाजप ओबीसी आघाडी ग्रामीण अध्यक्ष रवी गावंडे यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन बारा बलुतेदार यांचे कोरोना काळात व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांना स्वतंत्र आर्थिक पॅकेज त्वरित जाहीर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. ही मागणी मान्य न झाल्यास जन आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा भाजप ग्रामीण ओबीसी आघाडीतर्फे देण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना निवेदन देताना ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष रवींद्र गांवडे, सरचिटणीस दिलीप सागळे, ज्ञानेश्वर पोटे, भिकाभाऊ धोत्रे, क्रिष्णाभाऊ तिडके, लखन राजनकर, घनश्याम मालोकार, सदानंद निकामे, बाळकृष्ण गावंडे, परमेश्वर साखरे, शिवहरी आंबूसकर, आदित्य वानखडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फाेटाे
...................................
पाईप लाईन दुरुस्त करा
अकाेला : प्रभाग क्रमांक १८, कमला नगरमध्ये मुख्य रस्त्यावरील नळ पाईपलाईन लीक झालेली आहे. महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला मोठमोठे खड्डे खोदून ठेवलेले आहेत. लोकांना ये-जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही पाईपलाईन दुरूस्त करण्याची मागणी जिल्हा अध्यक्ष ग्रामीण युवा संघटनेचे उमेश इंगळे यांनी केली आहे
....................................................
महावीर जयंतीनिमित्त रुग्णसेवा
अकोला : भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त भाजप अल्पसंख्याक जैन प्रकोष्टच्या वतीने सर्वोपचार रुग्णालय व जिल्हा महिला रुग्णालयात महिला व पुरुष रुग्णांना रसना सरबत व फळ वितरण करण्यात आले. यावेळी आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, माजी महापौर विजय अग्रवाल, तेजराव थोरात, माधव मानकर, अल्पसंख्याक जैन प्रकोष्टचे विदर्भ प्रमुख शीतलकुमार जैन खाबिया, समीप इंदाने, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे महानगर अध्यक्ष जस्मित ओबेरॉय आदी उपस्थित होते.
...........................................
मोफत वैद्यकीय समुपदेशन सेवा
अकोला कोरोनाच्या संकटात रुग्णांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी भाजप अल्पसंख्याक जैन मोर्चाच्या वतीने वीरसेवक या नावाने संपूर्ण राज्यात मोफत समुपदेशन अभियान कार्यान्वित होत आहे, अशी माहिती भाजप अल्पसंख्याक मोर्चा जैनचे विदर्भ अध्यक्ष शीतलकुमार जैन खाबिया यांनी दिली आहे.
........................................