अकोला : आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना ‘पॉझीटीव्ह’ रुग्ण आढळल्याने, अकोला जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातून कोणीही येणार नाही, यासाठी आता जिल्ह्याच्या सीमांवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनामार्फत देशभरात ‘लॉकडाऊन ’ जाहीर करण्यात आले असून, २४ मार्चपासूनराज्यभरात संचार बंदी लागू करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणूचा ‘पॉझीटीव्ह रुग्ण आढळला नाही; मात्र आजूबाजूच्या बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू ‘पॉझीटीव्ह’ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अकोला जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढला वाढला आहे. त्यानुषंगाने पुणे, मुंबई आदी मोठ्या शहरांसह बाहेरच्या जिल्ह्यांतून अकोला जिल्ह्यात कोणीही येणार नाही. यासंदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत आता विशेष खबरदारी घेण्यात आली असून, जिल्ह्याच्या सर्व सीमांवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे.जिल्हयात बाहेरच्या जिल्ह्यातील कोणीही प्रवेश (एन्ट्री) करणार नाही, यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाहीकरण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस यंत्रणेला दिले.आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू ‘पॉझीटीव्ह’ रुग्ण आढळले असल्याने, जिल्ह्यात संसर्गाचा धोका वाढला आहे.
कार्यक्रमांचे आयोजन केल्यास कारवाई; जिल्हाधिकाºयांचा इशारा !
अकोला जिल्ह्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गित रुग्ण आढळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे जिल्हयाची जोखीम वाढली असून जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.अशा परिस्थितीत जिल्ह्यात धार्मिक, सामाजिक, राजकीय अशा सर्व कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोठेही असे कार्यक्रम, सामुहिक प्रार्थना होणार नसून,अशा कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जितेंद्र पापळकर यांनीरविवारी दिला.