अकोला, दि. १९- धोबी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करा व दशरथ भांडे समितीचा अहवाल लागू करा, या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) सेवा मंडळाच्या नेतृत्वात धोबी समाज बांधवांनी सोमवार १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर कपडे धुण्याचे आंदोलन करण्यात आले.सन १९४१ ते १९६0 पर्यंत विदर्भ मध्य प्रांतात असताना येथील धोबी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश होता. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर या सवलती बंद करण्यात आल्या. त्यामुळे धोबी समाजाचे शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व सामाजिक नुकसान मोठय़ा प्रमाणात झाले. हा अन्याय दूर करण्यात येऊन समाजाचा पूर्ववत अनुसूचित जातीत समावेश करण्यात यावा व दशरथ भांडे समितीचा अहवाल तत्काळ लागू करावा, या मागण्या राज्य शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी समाजाच्यावतीने आंदोलने करण्यात आली; परंतु त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. वारंवार निवेदने देऊनही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्यावतीने राज्यातील सर्व जिल्हय़ातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर सोमवार, १९ सप्टेंबर रोजी 'कपडे धुणे' आंदोलन करण्याची हाक देण्यात आली.त्या अनुषंगाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी हे आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धुतले कपडे!
By admin | Published: September 20, 2016 1:35 AM