तालुक्यात रविवारी दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. काही भागात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असल्याने पिकांना संजीवनी मिळाली, तर तालुक्यातील सदरपूर, खैरखेड भागात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदरपूर येथे नदीला पूर आल्याने पुलावर पाणी चढले होते. तर शेतशिवारात असलेल्या चार एकराचे शेततळे तुडुंब भरले. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात गेलेल्या मजुरांची तारांबळ उडाली होती. शेतरस्ते चिखलमय झाल्याने घरी परताना शेतकऱ्यांसह मजुरांना अडचणीचा सामना करावा लागला. परिसरातील सखल भागात पाणी साचले होते, त्यामुळे शेतीचे काम ठप्प पडली.
--------------------------------
खैरखेड, सदरपूर परिसरात रविवारी ढगफुटी सदृश पाऊस झाला. पावसामुळे शेतशिवारात पाणीच पाणी साचले होते. त्यामुळे कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागात सर्व्हे करून मदत द्यावी.
-धनंजय मेतकर, शेतकरी, खैरखेड.