अकोला : विदर्भात गत आठ दिवसापासून दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, थंडी कमी झाल्याने खरिपातील तूर पिकांचा फुलोरा झडण्याचे प्रमाण वाढल्याने उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.यावर्षी शेतकºयांनी नियमित खरीप पिकांसह सोयाबीन पिकातही तुरीचे आंतरपीक म्हणून पेरणी केली असून,पीकही जोरदार आले आहे.. तूर पीक सध्या फुलोरा अवस्थेत असून, थंडीचे वातावरण कमी झाल्यास त्याचे प्रतिकूल परिणाम होऊन फुलोरा गळण्याची शक्यता असते, तसेच किडींचा प्रादुर्भावही वाढतो. सध्या तुरीचर काही प्रमाणात शेंगा पोखरणाºया अळ््यांचा प्रादुर्भाव आहे.ढगाळ वातावरण किडींना पोषक ठरत असल्याने य किंडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकºयांचा किटकनाशके फवारणीचा खर्चही वाढला. अशात जर पाऊस आला तर आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.
५,२५० रू पये हमी दर जाहीरकेंद्र शासनासनाने यावर्षी तुरीला प्रतिक्ंिवटल ५,२५० रू पये हमीदर जाहीर केले. तसेच प्रतिक्ंिवटल २०० रू पये बोनसही मिळणार आहे.त्यामुळे शेतकरी आंनदीत असतानाच निसर्गाची अवकृपा आडवी येत असून, ढगाळ वातावरणामुळे शेतकºयांची चिंता वाढली, ढगाळ वातावरणामुळे थंडीचे प्रमाण कमी होत असल्याने तूर पिकांचा फुलोरा गळण्याची शक्यता असते. सध्या तुरीवरील शेंगा पोखरणाºया अळ््यांचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आहे तो वाढण्याची शक्यता जास्त आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी शेतकºयांची कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार कीडनाशकांची फवारणी करावी.- डॉ. मोहन खाकरे,ज्येष्ठ कृ षी शास्त्रज्ञ,विद्यावेत्ता,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.