लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने जिल्हाभर शनिवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यावेळी पोलिसांनी हद्दपार करण्यात आलेल्या तिघांना पकडले, तर अंधाराचा फायदा घेऊन आडोशाला असलेल्या एका संशयिताला ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशमध्ये स् थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. कोम्बिंग गस्तीदरम्यान उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने हद्दपार करण्यात आलेले इसम राहुल नरेंद्र माहोरे (३८) रा. विश्व मानव मंदिराजवळ डाबकी रोड, इरफान अहेमद सईद अहेमद, रा. कादरीपुरा अकोट फैल व तिसरा शुभम हरी सावंत (२३) रा. भीमचौक अकोट फैल शहरात दिसून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध १४२ महाराष्ट्र पोलीस अधिनियमप्रमाणे कारवाई करून डाबकी रोड पोलीस ठाणे व अकोट फैल पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. तसेच पेट्रोलिंगदरम्यान सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन बसस्थानकाच्या पाठीमागे राजेश्वरी हॉटेलजवळ अंधाराचा आडोसा घेऊन असलेल्या पवन ऊर्फ टकल्या विलास मोरे (२0) रा. लोहाबाजार अकोला हा संशयितरीत्या दिसून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेने राबविलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांचे रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 1:35 AM
अकोला : स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने जिल्हाभर शनिवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यावेळी पोलिसांनी हद्दपार करण्यात आलेल्या तिघांना पकडले, तर अंधाराचा फायदा घेऊन आडोशाला असलेल्या एका संशयिताला ताब्यात घेतले.
ठळक मुद्देतीन तडीपार घेतले ताब्यात