बार्शीटाकळी तालुक्यातील गोरव्हा येथे मुथा फाउंडेशन तसेच भारतीय जैन संघटना अकोला, गोरव्हा सरपंच राजेश खांबलकर यांच्या पुढाकाराने कोविड-१९ च्या कालावधीत सहयोगी शिक्षण उपक्रमांतर्गत पाच वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यासाठी पंधरा शिक्षण सारथी स्वयंप्रेरणेने तयार झाले आहेत. हे सर्व शिक्षण सारथी उच्चशिक्षित असून, शिक्षकासारखेच अध्यापन देत आहेत. हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे राबविल्या जात आहे. यावेळी गोरव्हाचे सरपंच राजेश खांबलकर, केंद्रप्रमुख गोकुळ अंभोरे, मुख्याध्यापक शिवहरी ताले उपस्थित होते. सर्व शिक्षण सारथी यांना प्रेरणा म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. अकोला, अध्यक्ष जि. प. अकोला व शिक्षण सभपती यांच्या स्वाक्षरीने प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्याचे सभपती पांडे गुरुजी यांनी सांगितले. (फोटो)
सहयोगी शिक्षण जिल्हाभर सुरू करणार : चंद्रशेखर पांडे गुरुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:16 AM