मूर्तिजापूर : स्थानिक क्रीडा संकुलात आमदार हरिष पिंपळे यांच्या अध्यक्षतेखालील क्रीडा संकुल समितीच्या वतीने तालुक्यातील पोलीस भरती करिता इच्छुक असणा-या गरजू युवक-युवतींसाठी भरती पूर्व लेखी व मैदानी प्रशिक्षण मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. याकरिता क्रीडा संकुलातील मैदानात करण्यात आलेल्या सुधारणा, प्रगतीपथावर असलेल्या इन डोअर क्रीडा हॉल व मोफत वाचनालयाच्या कामाची जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी १५ एप्रिल रोजी पाहणी केली. तसेच क्रीडा संकुल समितीतर्फे आयोजित पोलीस भरती पूर्व लेखी व मैदानी मोफत प्रशिक्षण शिबिर उपक्रमाला जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या उज्जवल भविष्य घडविण्याकरिता आगामी काळात प्रशासकीय स्तरावरून आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. त्यांच्यासोबत आमदार हरीष पिंपळे प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी उपविभागीय अधिकारी भागवत सैदाने, तहसीलदार राहुल तायडे, नायब तहसीलदार वैभव फरताडे, ,क्रीडा संकुलतर्फे प्रशिक्षक विनोद काळपांडे, गजानन काळसरपे ,भाजपा तालुकाध्यक्ष नारायणराव भटकर, संदीप जळमकर, संतोष कपिले, राजू गुल्हाने संतोष भांडे व अन्य अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)
जिल्हाधिकार्यांनी केली क्रीडा संकुलाची पाहणी
By admin | Published: April 17, 2017 4:45 PM