अशी झाली रंगीत तालीम
सर्वप्रथम लाभार्थ्याच्या ओळखपत्राची पडताळणी करून त्याला टोकन देण्यात आले. त्यानंतर ‘कोविन’ ॲपवर लाभार्थ्याचे नाव व मोबाइल क्रमांकाची पडताळणी करण्यात आली.
हातात लस टोचण्यात आली.
लसीकरणानंतर लाभार्थ्याला निरीक्षण कक्षात ठेवण्यात आले.
काय झाली गडबड
लसीकरणाचा मेसेज मिळाला; पण लाभार्थींच्या यादीत नावच नसल्याचा अनुभव एक, दोन जणांना आला.
‘कोविन’ ॲपद्वारे लाभार्थींच्या ओळखपत्राची पडताळणी करताच त्यांना लस दिल्याचीही नोंद झाल्याचे काहींच्या बाबतीत घडले.
काहींना लसीकरणानंतर मेसेज प्राप्त झाले नाहीत.
काहींना ३० मिनिटे, तर काहींना १५ ते २० मिनिटांसाठीच ठेवले निरीक्षणात.
प्रत्यक्ष लसीकरणावेळी होऊ शकतो गोंधळ.
कोविडचे लसीकरण पहिल्यांदाच होणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर दिलेल्या सूचनांचे पालन करणे अनिवार्य आहे. प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी या पद्धतीने गडबड झाल्यास गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.