कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमीत कमी लोकांमध्ये ग्रामस्थांना विकासाची संकल्पना व पोकरा प्रकल्पाच्या विकासाच्या आराखड्याबाबत ग्रामपंचायत गोरेगाव येथे ऋतूचक्र पीकपद्धती विषयांवर चर्चा करण्यात आली कृषी सहाय्यक शुभांगी कथलकर(गिर्हे) यांनी ग्रामस्थांना सूक्ष्म नियोजनाचा तांत्रिक बाबी व कृती आराखड्याची प्रपत्रे समजावून सांगून जल व मृदा जलसंधारणाचे महत्त्व सांगितले. मंडळ कृषी अधिकारी विलास चव्हाण यांनी पोकरा प्रकल्पाच्या योजनांची माहिती दिली. सूक्ष्म नियोजन प्रक्रियेसाठी सरपंच यशोदा देवानंद सरदार व कृषी सहाय्यक प्रतीक अवगन, काळे, तात्याराव गडदे, श्रीराम रासकर, समूह सहाय्यक कुलदीप थोरात, प्रतीक बढे, विजय डोईफोडे, फायजोद्दीन शेख, राजू पिसाट, देवानंद सरदार, जगन सरदार, श्रीकांत डोईफोडे यांनी परिश्रम घेतले.
गोरेगाव येथे सूक्ष्म नियोजन आराखड्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:33 AM