अकाेला : गेल्या शंभर वर्षांत सहकारी संस्था लोक सहभागातून विकसित झाल्या आहे. विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून सहकारी चळवळ बळकट होत गेली आहे. शतकाहून अधिक आयुष्य असलेल्या सहकारी चळवळीत ग्रामीण परिसरातील प्राथमिक सहकारी संस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा ठरल्या आहे. सेवा सहकारी संस्था उत्तम प्रकारे टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे. तसेच शेती कर्जावर बँक चालू शकत नाही. निसर्गातील बदलांचा वेध घेऊन बिगरशेती कर्जव्यवहार वाढला पाहिजे. तसेच सेवा सहकारी संस्थांची सभासदांकडून अल्पमुदती पीककर्जाची वसुली होण्याकरिता संस्थेचे अध्यक्ष यांनी पुढाकार घ्यावा. तसेच सुरक्षित अंतर ठेवून मास्कचा वापर करा, स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्या, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष डॉ.संतोषकुमार कोरपे यांनी केले. ते दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १०९ व्या वार्षीक आमसभेत बोलत होते. अहवाल वाचन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांनी केले. आमसभेत बँकेचे सभासद असलेल्या सहकारी संस्थांना ६ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला. आमसभेत माजी अध्यक्ष डॉ.सुभाषचंद्र कोरपे, माजी आमदार ॲड.सुहासराव तिडके, हिदायतउल्लाखाँ पटेल, आमदार अमित झनक यांनी समयोचित मार्गदर्शन केले. आमसभेस बँकेचे उपाध्यक्ष वामनराव देशमुख, रमेश हिंगणकर, माजी मंत्री सुभाषराव ठाकरे, राजेश राऊत , दिलीपराव जाधव, श्रीधरराव कानकिरड, दामोदर काकड यांच्यासह अकोला व वाशिम जिल्ह्यांतील सहकारी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
फाेटाे - एच - ३१सीटीसीएल०१