- महाराष्ट्र
आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकतर्फे मागील वर्षी पार पडलेल्या व शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मधील
बिहीएस
अंतिम वर्षाची परीक्षा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेली होती. या अंतिम वर्षाच्या परीक्षेत कु. अलीसा तौकीर उस्मान ही विद्यार्थिनी महाराष्ट्रातून व विद्यापीठातून प्रथम आलेली असून तिने ओरल ॲण्ड मक्झिलो फेशिअल सर्जरी व ओरल मेडिसीन ॲण्ड रेडिओलाॅजी या दोन्ही विषयांत गोल्ड मेडल प्राप्त केलेले आहे. तसेच कु. साक्षी राजेश कांबे हिनेसुद्धा अंतिम वर्षाच्या परीक्षेत कॉन्झर्वेटिव्ह डेन्टिस्ट्री या विषयात गोल्ड मेडल प्राप्त केलेले आहे. अंतिम वर्षाच्या आठ विषयांपैकी डॉ. आर.आर. कांबे दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी तीन विषयांत प्रथमस्थान मिळवून गोल्ड मेडल मिळविण्यात यश संपादन केलेले आहे. कु. साक्षी, रा. कांबे हिने द्वितीय वर्षाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावलेला होता.
डॉ. आर.आर. कांबे दंत महाविद्यालयाची सुरुवात सन २०१५-२०१६ मध्ये झालेली होती. या पाच वर्षांच्या कालावधीत महाविद्यालयाने दोन मेरीट स्टुडंट दिलेले आहे. तसेच या वर्षी चार विषयांसह पदव्युत्तर (Post Graduate) MDs अभ्यासक्रमास मान्यता मिळालेली आहे. या यशाचे श्रेय विद्यार्थिनी संस्थेच्या अध्यक्षा, अनुश्री राजेश कांबे व सचिव डॉ. राजेश रामदासजी कांचे तसेच दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता, डॉ. पी.व्ही. वंजारी, उपअधिष्ठाता, डॉ. प्रवीण लांबाडे, प्रशासकीय अधिकारी, चंद्रशेखर भानुसे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग यांना देण्यात येत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थीवर्गातून दोन्ही विद्यार्थिनींचे कौतुक केलेले आहे.
८ बाय १०
फोटो - आर / यूजर / advt /कांबे