अकोला : ऐन सण-समारंभाच्या काळात व्यावसायिक ठिकाणी घरगुती सिलिंडरचा सर्रास उपयोग होत असल्याचे वास्तव बुधवारी ह्यलोकमतह्णने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आले. दिवसाढवळ्य़ा भर रस्त्यावर घरगुती सिलिंडरचा उपयोग होत असतानाही पुरवठा विभागाचे मात्र, याकडे दुर्लक्ष असल्याने व्यावसायिकांची मुजोरी वाढल्याचे निदर्शनास आले आहे. आगामी काळात दिवाळी असल्याने घरगुती सिलिंडरचा तुटवडा भासण्याची दाट शक्यता आहे. त्याअनुषंगाने नागरिक आतापासूनच सिलिंडरच्या जुळवाजुळवसाठी धावपळ करीत आहेत. असे असताना शहरात घरगुती सिलिंडरचा सर्रास उपयोग होत आहे. हा प्रकार उघडकीस यावा, म्हणून ह्यलोकमतह्णने बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी शहरातील विविध भागात शोध मोहीम राबविली. ह्यलोकमतह्णने राबविलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान ऐन दसरा, दिवाळीच्या काळात घरगुती सिलिंडरचा उपयोग व्यावसायिक उपयोगासाठी होत असल्याचे निदर्शनास आले. या शोध मोहिमेसाठी ह्यलोकमतह्ण चमू सर्वप्रथम बसस्थानक परिसरात पोहोचली. येथे मुख्य रस्त्यावर काही किरकोळ खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी लोटगाड्यांवर प्रतिष्ठाने थाटली आहेत. यातील काही व्यावसायिक खाद्य पदार्थ निर्मितीसाठी इंधन म्हणून घरगुती गॅस सिलिंडरचा उपयोग करत असल्याने दिसून आले. असाच प्रकार जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात पोहोचताच लोकमत चमूला दिसून आला. या ठिकाणी एका चहाच्या टपरीवर पोत्यामध्ये घरगुती सिलिंडर झाकून ठेवल्याचे आढळून आले. यानंतर लोकमत चमू दुर्गा चौका मार्गे स्टेशनकडे जाण्यासाठी निघाली असता मध्ये काही खासगी रुग्णालयांसमोर व्यावसायिकांकडून घरगुती सिलिंडरचा उपयोग सर्रास होत असल्याचे दिसून आले.
घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर!
By admin | Published: October 22, 2015 1:47 AM