- संतोष येलकरअकोला: कपाशी, सोयाबीन व तुरीचे दर घसरल्याने, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घरात शेतमाल पडून आहे. गरज भागविण्यासाठी कमी दरात शेतमाल विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. त्यामुळे मिळणाºया कमी दरात शेतमाल विकावा की नाही, असा पेच शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.दुष्काळी परिस्थितीत पिकांचे उत्पादन बुडाल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. नापिकीच्या स्थितीत शेतमालास चांगला भाव मिळण्याची अपेक्षा शेतकºयांकडून करण्यात येत असतानाच, गत महिन्याच्या तुलनेत कपाशी, सोयाबीन व तूर इत्यादी शेतमालाच्या दरात प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपये दर घसरण झाली आहे. शेतमालाला कमी भाव मिळत असल्याने भाव वाढण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकºयांच्या घरात कपाशी, सोयाबीन आणि तूर इत्यादी शेतमाल अद्याप पडून आहे. शेतमालाच्या दरात वाढ होत नसल्याने, गरज भागविण्यासाठी मिळणाºया कमी दरात घरातील शेतमाल विकण्याची वेळ आता शेतकºयांवर आली आहे. त्यामुळे शेतमालाला योग्य दर केव्हा मिळणार, याबाबत प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकºयांसमोर गरज भागविण्यासाठी मिळणाºया कमी दरात शेतमाल विकावा की नाही, असा निर्माण झाला आहे.
महिनाभरापूर्वी आणि आता असे आहेत शेतमालाचे दर!महिनाभरापूर्वी कपाशीला प्रतिक्विंटल ५ हजार ९०० रुपये दर मिळत होता. आता ४ हजार ८०० ते ५ हजार ३०० रुपये दर मिळत आहे. सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल ३ हजार ९०० रुपये होते. आता ३ हजार ते ३ हजार ५०० रुपये दर मिळत आहे. तुरीचे दर प्रतिक्विंटल ५ हजार ७०० रुपये होते. आता ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये दर मिळत आहे.कमी भाव मिळत असल्याने कपाशी, सोयाबीन व तूर घरात पडून आहे. चांगला भाव मिळेल या अपेक्षेने परिस्थिती नसताना शेतमाल घरात ठेवला आहे. परंतू भाव मिळत नसल्याच्या परिस्थितीत गरज भागविण्यासाठी आता कमी दरात शेतमाल विकण्याची वेळ आली आहे.-शिवाजी भरणेशेतकरी, रामगाव, ता.अकोला.महिनाभरापूर्वी कापसाला प्रती क्विंटल ६ हजार रुपयांपर्यत भाव मिळाला.आता कापसाला प्रती क्विंटल ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. कमी भाव मिळत असल्याने कापूस घरात पडून आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.-लक्ष्मी गुणवंत खोबरखेडेमहिला शेतकरी, खोबरखेड.