या बोगस बियाणांची तक्रार काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केली हाेती, त्यानंतर कृषी विभागाकडून पंचनामेसुद्धा करण्यात आले; मात्र नुकसानभरपाई मिळालीच नाही. मध्यंतरी महाबीजकडून भरपाई मिळण्याची माहिती समोर आली होती; मात्र अद्यापही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. यावर्षी अवकाळी पावसाने सोयबीनचे प्रचंड नुकसान झाले. आधीच दुबार पेरणीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, तरी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
.....................
खरीप हंगामात महाबीजचे बियाणे पेरले हाेते; मात्र ते उगवले नाही. परिणामी दुबार पेरणी करावी लागल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. महाबीजकडून नुकसानभरपाई मिळण्याची अपेक्षा आहे.
- प्रकाश पाटील कोकाटे, शेतकरी, बाभूळगाव