लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुद्रण व्यवसाय हा भारतात कमी असला, तरी जगात तो अव्वल क्रमांकाचा व्यवसाय आहे. आता मुद्रकाची आवश्यकता जिल्हा स्तरापर्यंत र्मयादित राहिली नसून, ती ग्रामीण भागातही पोहोचत आहे. मात्र, मुद्रक आपल्याच व्यवसायात स्पर्धा करून सहकार्याचे नुकसान करीत आहेत. स्पर्धा करायचीच असेल, तर विकसित अद्ययावत तंत्रज्ञानाची करा, यामुळे ग्राहकांना लाभ होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर यांनी केले.
महाराष्ट्र मुद्रण परिषदेंतर्गत रविवारी सकाळी अकोल्या तील मेळाव्यात ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. अकोला जिल्हा मुद्रक संघ, अकोला डिस्ट्रीक झेरॉक्स ओनर्स असोसिएशन व अकोला-बुलडाणा जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने शेकडो सदस्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुद्रण परिषदेचे कमलेश धारगळकर, प्रिन्ट पॅकेजिंगचे शंतनू बारस्कर, ए.आय.एफ.एम.पी. जाइंट सेक्रेटरी प्रकाश जोशी, अकोला जिल्हा मुद्रक संघाचे अध्यक्ष प्रदीप गुरूखुद्दे, अकोला जिल्हा झेरॉक्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष पंकज जायले, अकोला बुलडाणा जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद मानकर मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. सकाळी या मेळाव्याचे उद्घाटन झाले. अनेक मान्यवरांचा येथे सत्कार करण्यात आला. ग्लोबल टेक्नॉलॉजीचे पदाधिकारी, श्रीलिपीचे अधिकारी आदी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणार्या कंपनीचे प्रतिनिधी येथे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन उपाध्यक्ष संजय देशमुख यांनी केले. प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष प्रदीप गुरूखुद्दे यांनी, तर आभार सचिव राजेंद्र देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सल्लागार बालमुकुंद अग्रवाल, बाबाराव आमले, बाबूसेठ अग्रवाल, प्रवीण सारभूकन, नंदू बाहेती, संतोष धरमकर, नागोराव लाटे, शैलेशा तिवारी, श्याम टावरी, प्रमोद भाकरे, गजानन चांदूरकर, मोहन सराग, किशेर पिंपळे, जगदीश झुनझुनवाला, सुचित देशमुख, गणेश मावळे यांनी परिश्रम घेतलेत.