पाच मतदारसंघात काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चुरस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 02:47 PM2019-07-31T14:47:12+5:302019-07-31T14:47:30+5:30
अकोला: विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होणार हे जवळपास निश्चित असले तरी काँग्रेस पक्षाने सर्वच मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होणार हे जवळपास निश्चित असले तरी काँग्रेस पक्षाने सर्वच मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.
जिल्ह्यात विधानसभेचे पाच मतदारसंघ असून, या मतदारसंघांसाठी काँग्रेस निरीक्षकांनी मंगळवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यात. यावेळी ५० इच्छुकांनी मुलाखती देत आपल्या कार्याचा लेखाजोखा सादर केला.
पक्ष निरीक्षक म्हणून बुलडाणा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार राहुल बोंद्रे, राहुल ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा काँग्रेसच्या पार्लेमेंटरी बोर्डने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. सकाळी स्थानिक स्वराज्य भवनात अकोला पश्चिम मतदारसंघासाठी सुरू झालेल्या मुलाखती संध्याकाळपर्यंत चालल्या. यावेळी ५० उमेदवारांनी आपल्या कार्याचा लेखाजोखा पक्षश्रेष्ठींकडे सादर करून आपलीच उमेदवारी कशी योग्य आहे, याचे दावे केले. या मुलाखतींना जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगरअध्यक्ष माजी आ. बबनराव चौधरी, कार्याध्यक्ष सुनील धाबेकर, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, नतीकोद्दीन खतीब, मदन भरगड, बाबाराव विखे पाटील, रामदास बोडखे, डॉ. सुभाष कोरपे, साधना गावंडे, पुष्पा देशमुख, महेश गणगणे, अंशुमन देशमुख, कपील रावदेव, देवेश पातोडे आदी उपस्थित होते.
पश्चिमसाठी सर्वाधिक; पूर्वसाठी अवघे चार
अकोला पश्चिम या मतदारसंघासाठी काँग्रेसमधून सर्वाधिक इच्छुक आहेत. तब्बल १६ इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १४ इच्छुकांनी आज मुलाखती दिल्या. अकोला पूर्व मतदारसंघासाठी अवघ्या चार उमेदवारांनी दावेदारी केली आहे.
यांनी दिल्या मुलाखती
अकोला पश्चिम :- डॉ. जिशान हुसैन, विभा राऊत, साजिदखान पठाण, मदन भरगड, अविनाश देशमुख, रमाकांत खेतान, मोहम्मद नौशाद, सुरेश पाटील, अ. जब्बार अ. रहमान, बबनराव चौधरी, आकाश कवडे, चंद्रकांत सावजी, प्रदीप वखारिया.
अकोला पूर्व - दादाराव मते पाटील, अजाबराव टाले, विवेक पारसकर, गजानन आमले.
अकोट - डॉ. संजीवनी बिहाडे, महेश गणगणे, बालकृष्ण बोंद्रे, डॉ. प्रमोद चोरे, अशोक अमानकर, प्रशांत पाचडे, संजय बोडखे, निनाद मानकर, रमेश म्हैसने, शोएबअली मिरसाहेब, डॉ. पुरुषोत्तम दातकर, श्याम भोपळे, मनीषा भांबुरकर.
मूर्तिजापूर - आशिष बरे, ब्रम्हदेव इंगळे, भूषण गायकवाड, देवीदास कांबळे, महेंद्र गवई.
बाळापूर - प्रकाश तायडे, डॉ. रफीख शेख, चंद्रशेखर चिंचोलकार, श्रीकृष्ण अंधारे, सैय्यद एनोद्दीन खतीब, राजेश गावंडे, वामनराव देशमुख, डॉ. सुधीर ढोणे, अजहर इकबाल मजहर खान, सतीश पवार, पंढरी आडोळे, अजय ताथोड, विजय शर्मा, प्रवीण जैन, रामसिंग जाधव.