अकोला, दि. ३- इंधन टाकीमध्ये डिझेलऐवजी रॉकेल असलेला ट्रक आकोट पोलिसांनी ५0 हजार रुपये घेऊन सोडल्याचे खळबळजनक प्रकरण एका 'कॉल रेकॉर्डिंग'मुळे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. आकोट येथील पांडे नामक माहिती अधिकार कार्यकर्त्याने एसीबीकडे तक्रार केली. आकोट पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी दिवसभर हा ट्रक ठाण्यातच उभा ठेवून कोणतीही कारवाई न करता ५0 हजार रुपये घेऊन सोडून दिल्याचे रेकॉर्डिंग समोर आले आहे. या रॉकेल माफियाने हप्ते दिल्यावरही पोलिसांनी ट्रक पकडल्याचा आरोप रेकॉर्डिंगमध्ये केला आहे.याबाबत आकोट येथील रहिवासी व माहिती अधिकार कार्यकर्ते मोहन उत्तमराव पांडे यांनी या प्रकरणाची तक्रार एसीबीकडे करून संबंधितांवर लाचखोरीचे गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
रॉकेल ट्रक प्रकरणाची एसीबीकडे तक्रार
By admin | Published: October 04, 2016 2:25 AM