शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

राज्य माहिती आयोगाच्या ‘वेबपोर्टल’वर आता तक्रारपेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 4:18 AM

संतोष येलकर अकोला : माहिती अधिकारात अर्ज दाखल करणाऱ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाच्या ‘वेबपोर्टल’वर आता ...

संतोष येलकर

अकोला : माहिती अधिकारात अर्ज दाखल करणाऱ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाच्या ‘वेबपोर्टल’वर आता तक्रारपेटी लावण्यात आली आहे. माहिती अधिकारातील अर्जांसंदर्भात ऑनलाइन तक्रारपेटीद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण तातडीने करण्यात येणार आहे.

माहितीच्या अधिकारात माहिती मिळविण्यासाठी वेगवेगळ्या विभागांत अर्ज सादर करण्यात येतात. परंतु माहिती अधिकारात माहिती मिळविण्यासाठी केलेला अर्ज संबंधित विभागांत स्वीकारण्यात येत नाही, अर्ज स्वीकारण्यासाठी संबंधित अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नाही, दाखल केलेल्या अर्जाची अनेकदा दखल घेण्यात येत नाही, अर्ज केल्यानंतर माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येते त्यामुळे संबंधित विषयाची माहिती मिळत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी अर्जदारांकडून होत असतात. त्यामुळे माहिती अधिकारात माहिती मिळण्यासाठी अर्जदारांना त्रास होऊ नये, तातडीने माहिती उपलब्ध व्हावी यासाठी माहिती अधिकारात माहिती मिळविण्यासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांना त्रास होऊ नये, यासाठी राज्य माहिती आयोगाच्या अमरावती खंडपीठाच्या ‘वेबपोर्टल’वर १० डिसेंबरपासून तक्रारपेटी सुरू करण्यात आली आहे. वेबपोर्टलवर तक्रारपेटीद्वारे ऑनलाइन प्राप्त होणाऱ्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यात येणार आहेत.

ही माहिती नमूद करणे आवश्यक !

माहिती अधिकारात माहिती मिळण्यास त्रास होत असलेल्या अर्जदारांना राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाच्या वेबपोर्टलवरील तक्रारपेटीमध्ये अर्जदारांना मोबाइल क्रमांक, तक्रार असलेल्या संबंधित अधिकाऱ्याचे पद नमूद करणे आवश्यक आहे. माहिती अधिकारात माहिती मिळण्यासाठी

अर्जदारांना होणाऱ्या त्रासासंदर्भात तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाच्या वेबपोर्टलवर तक्रारपेटी सुरू करण्यात आली आहे. वेबपोर्टलवरील तक्रारपेटीद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यात येणार आहेत.

-संभाजी सरकुंडे, राज्य माहिती आयुक्त, अमरावती खंडपीठ