अकोला: महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे संचालक भालचंद्र खंडाईत यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करताना अकोला मंडळातील महावितरण कार्यालयांमध्ये तक्रारपेट्या बसविण्याचे काम सुरु झाले आहे. परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवन येथे तक्रार पेट्या बसविण्यात आले असून, जिल्हाभरातील कार्यालयांमध्ये या कामास सुरुवात झाली आहे.महावितरणच्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयांनी वीज ग्राहकांना नियमित वेळ देऊन त्यांच्या तक्रारी, सूचना जाणून घ्याव्यात, ग्राहकांसाठी आपण सहजपणे उपलब्ध झाल्यास ग्राहकही थेट आपल्याकडे येईल, कुणा मध्यस्थामार्फत येणार नाहीत यासाठी महावितरणच्या प्रत्येक कार्यालयांमध्ये तक्रार पेट्यांची सुविधा निर्माण करा, असे निर्देश नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी गत आठवड्यात अकोला येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत दिले होते. प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये तक्रार पेट्या असणे गरजेचे असतानाही महावितरणच्या अनेक कार्यालयांमध्ये तक्रार पेट्या नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे वीजग्राहकांना तक्रार कुठे करावी असा पेच पडत होता. यावर उपाय म्हणून प्रादेशिक संचालकांनी महावितरणच्या प्रत्येक कार्यालयांमध्ये तक्रार पेट्या बसविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आता जिल्ह्यातील सर्वच महावितरण कार्यालयांमध्ये तक्रार पेट्या बसविण्यात येत आहेत. अकोला येथील विद्युत भवनच्या प्रवेशद्वार आणि अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांच्या कक्षासमोर तक्रारपेट्या बसविण्यात आल्या आहेत.तक्रारीसाठी दूरध्वनी क्रमांकग्राहकांना त्यांची तक्रार नोंदविण्यासाठी महावितरणच्या अकोला परिमंडलांतर्गत ७८७५७६३३५० हा दूरध्वनी क्रमांक उपल्ब्ध करून देण्यात आला असून, त्यावर आलेल्या तक्रारींची दखल स्वत: मुख्य अभियंता घेणार आहेत. याशिवाय महावितरणच्या मुंबई येथील मुख्यालयानेही यासाठी हेल्पलाइन सुरू केली असून, तेथील ०२२-२६४७८९८९ किंवा ०२२-२६४७८८९९ या क्रमांकावर ग्राहक त्यांची तक्रार नोंदवू शकतात.
अकोला जिल्ह्यात महावितरणच्या सर्वच कार्यालयांमध्ये बसविण्यात येत आहेत तक्रारपेट्या!
By atul.jaiswal | Published: November 03, 2017 4:13 PM
अकोला: महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे संचालक भालचंद्र खंडाईत यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करताना अकोला मंडळातील महावितरण कार्यालयांमध्ये तक्रारपेट्या बसविण्याचे काम सुरु झाले आहे.
ठळक मुद्देप्रादेशिक संचालकांच्या सूचनांची अंमलबजावणी विद्युत भवनात बसविली तक्रार पेटी