अकोला: अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ ३८ हजार शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीच्या तक्रारी संबंधित पीक विमा कंपनीकडे सादर करण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ९० हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. दरम्यान, जिल्ह्यात अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित पीक विमा कंपनीसह कृषी, महसूल विभाग, पंचायत समित्या व संबंधित बँकांमार्फत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून पीक नुकसानीच्या तक्रारी व सूचना अर्ज स्वीकारण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील १ लाख ९० हजार शेतकऱ्यांपैकी केवळ ३८ हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी पीक विमा कंपनीकडे प्राप्त झाल्या आहेत.
केवळ ३८ हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी विमा कंपनीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 10:29 AM