अकोला, दि. २0-नोटाबंदी झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांत सोन्याच्या दागिन्यांसह सोन्याच्या बिस्किटांची मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्री करणार्या अकोल्यातील तीन बड्या सराफा व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानांची आयकर खात्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी तपासणी पूर्ण केली. तब्बल ३0 अधिकार्यांचा समावेश असलेल्या पथकाने तीन दिवसांत गांधी चौकातील केजे स्क्वेअर (खंडेलवाल ज्वेलर्स), खंडेलवाल अलंकार केंद्र आणि विश्वकर्मा ज्वेलर्सची संशयावरून तपासणी केली. बुधवारपासून सुरू असलेली तीनही ज्वेलर्स प्रतिष्ठानांची तपासणी तीन दिवसांनंतर शुक्रवारी पूर्ण झाली.
तीनही बड्या सराफा प्रतिष्ठानांची तपासणी पूर्ण
By admin | Published: January 21, 2017 2:56 AM