शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

पंचनामे पूर्ण ; तूर खरेदीच्या ठिकाणी लावले ‘सीसी कॅमेरे’

By admin | Published: April 28, 2017 1:58 AM

अकोला : जिल्ह्यातील ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांवरील तुरीचे पंचनामे गुरुवारी पूर्ण करण्यात आले असून, तूर खरेदीच्या ठिकाणी ‘सीसी कॅमेरे’देखील लावण्यात आले आहेत.

अकोला : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांवरील तुरीचे पंचनामे गुरुवारी पूर्ण करण्यात आले असून, तूर खरेदीच्या ठिकाणी ‘सीसी कॅमेरे’देखील लावण्यात आले आहेत.हमीदराने ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी गत २२ एप्रिल रोजी सायंकाळपासून बंद करण्यात आली. नाफेडद्वारे तूर खरेदी बंद करण्यात आल्याने जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या पाच खरेदी केंद्रांवर गत दीड महिन्यापासून मोजमापाच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या १ हजार ९६३ ट्रॅक्टरमधील १ लाख ७ हजार ९७ क्विंटल तुरीचे मोजमाप रखडले होते. नाफेडद्वारे हमीदराने तूर खरेदी बंद करण्यात आली आणि बाजारात व्यापाऱ्यांकडून तुरीला योग्य भाव मिळत नसल्याने तूर कुठे विकणार, याबाबतचा प्रश्न तूर उत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. या पृष्ठभूमीवर तूर खरेदी केंद्रांवरील मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेल्या तुरीचे पंचनामे करून तूर खरेदीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला. यासंबंधीचा आदेश २६ एप्रिल रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाला शासनामार्फत प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यातील नाफेडद्वारे तूर खरेदीच्या पाचही खरेदी केंद्रांवर मोजमाप बाकी असलेल्या तुरीचे पंचनामे करून तूर खरेदी तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारीच जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार गुरुवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील पाचही तूर खरेदी केंद्रांवर तुरीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले. अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी केंद्रावर तहसीलदार राजेश्वर हांडे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी मनोज वाजपेयी यांच्यासह तालुका उपनिबंधक, बाजार समिती सचिव, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांमार्फत संयुक्तरीत्या तुरीचे पंचनामे करण्यात आले.जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशानुसार तूर खरेदी केंद्राच्या परिसरात मोजमापाच्या ठिकाणी ‘सीसी कॅमेरे’ लावण्यात आले.