अकोला : सिंचन, गुरेढोरे व पिण्याच्या पाण्यासाठी तसेच खारपाणपट्ट्यातील दुष्काळी दुर्भिष्य घालवण्यासाठी पूर्णा खोऱ्यात रोहणा, मंगरुळकांबे, घुंगशी व नेरधामणा येथे बॅरेजची निर्मितीचे प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्याची मागणी करीत नेरधामणा गांधीसागर-गांधीग्राम सर्वोदय पदयात्रा काढून जागर करण्यात आला.
अकोला जिल्हा सर्वोदय मंडळातर्फे काढण्यात आलेल्या सर्वोदय पदयात्रेच्या प्रारंभी नेरधामणा गांधीसागर येथे ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार, रामराव पातोंड, सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निसर्गोपचार संस्थेचे सचिव डॉ. काशिनाथ दाते, जयकृष्ण वाकोडे अकोट, महेश आढे, अभियंता प्रविण सैतवाल, केंद्रप्रमुख साहेबराव पातोंड यांची प्रमुख उपस्थिती होती.
गांधीसागर येथे जलपुजनानंतर जि.प.प्राथमिक शाळा धामणा येथे सरपंच उज्ज्वलाताई भांबेरे, शाळासमिती अध्यक्ष रणजीत सावंग, केंद्रप्रमुख पातोंड, मुख्याध्यापक विजय बोरसे, निशांत खंडारे, अभियंता शुभम पातोंड, नितीन सावंग, काळे यांचेसह ग्रामस्थांनी पदयात्रेचे स्वागत केले. नैराट, वैराट, राजापूर येथे पदयात्रींनी शेतकरी शेतमजुरांसोबत संवाद केला.ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार यांनी पाणी अडवा,माती वाचवा,माणुसकी वाढवा,नेरधामणा व काटीपाटी बॅरेजचे काम ताबडतोब पूर्ण करण्याचे आवाहन प्रत्येक ठिकाणच्या सभेत केले. बबनराव कानकिरड यांनी ही पदयात्रा शेती,माती,माणुसकीचे नाते निर्माण करणारी चळवळ असल्याचे भावपूर्ण आवाहन केले. महात्मा गांधी, विनोबा भावे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयघोषाने सायंकाळी या यात्रेने
गोपाळखेडकडे प्रस्थान केले.