यावेळी हभप ज्ञानेशप्रसाद महाराज पाटील, हभप वासुदेवराव महाराज महल्ले यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री संत वासुदेव महाराज पालखी सोहळा व्यवस्थापक हभप अंबादास महाराज मानकर, श्री संत भास्कर महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, श्रीक्षेत्र आकोली जहागीरचे अध्यक्ष हभप अशोक महाराज जायले, संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, श्रीक्षेत्र श्रद्धासागरचे विश्वस्त नंदकिशोर हिंगणकर, तसेच प्रा. साहेबराव मंगळे, प्रा. नंदकिशोर झामरे, इंद्रायणी पाटील, शारदा गावंडे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तसेच या प्रवचनांमधून गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, श्रीमद्भागवत, वेद, शास्त्र, पुराणे, संतचरित्रे, श्रीगुरूंची विविध सेवाकार्ये आदींबद्दल मिळालेले ज्ञानामृत बहुमोल स्वरूपाचे असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन उमेश मोहोकार यांनी केले. कार्यक्रमाला श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, अकोटचे विश्वस्त दादारावजी पुंडेकर, मोहन महाराज रेळे, मंगेश महाराज ठाकरे, विठ्ठलराव मंगळे, उद्धवराव ठाकरे, वसंतराव पागृत, कृष्णा गावंडे, अरुण मोहोड, सुधाकरराव पुंडकर, श्रीधरराव जायले, माधवराव मोहोकार आदी उपस्थित होते.
अकोटात त्रिवेणी प्रवचन सेवेचा तपपूर्ती सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:20 AM