वादविवाद स्पर्धेत ऋत्विक टाले, अनिकेत पजई व पार्थ खंडेलवाल यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविले व यश शिंदेला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. उत्स्फूर्त भाषण स्पर्धेत पार्थ खंडेलवाल लेखांकित पत्रे व अंजली ढोरे यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविले व प्रिया फड हिला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. रांगोळी (१५ विद्यार्थी) यामध्ये विशाखा धोटे प्रथम अभिश्री सूर्यवंशी द्वितीय, तर सोनाली डोये हिने तृतीय क्रमांक पटकाविला. कोमल बांदूरकर हिला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. पोस्टरमेकिंग स्पर्धा (१० विद्यार्थी) यामध्ये प्रथम क्रमांक सोनाली डोये, द्वितीय क्रमांक रुचिता भिसे, तसेच तृतीय क्रमांक दीपाली महाले यांनी पटकाविला. फॅशन शो (८ विद्यार्थी) यामध्ये कोमल बांदुरकर आणि गरीशा वार ह्या अनुक्रमे प्रथम व द्वितीय आल्या. अंताक्षरीमध्ये प्रथम क्रमांक पार्थ खंडेलवाल, द्वितीय क्रमांक साक्षी आडे, तसेच तृतीय क्रमांक प्रतीक्षा टाले यांनी पटकाविला.
गीत सादर करणे (५ विद्यार्थी) यामध्ये प्रथम क्रमांक अक्षया नायर, द्वितीय क्रमांक लेखांकिता पत्रे, तसेच तृतीय क्रमांक प्रतीक्षा टाले यांनी पटकाविला. नृत्य (१५ विद्यार्थी) गरीशा वार, शिवराज गिते हे प्रथम व द्वितीय आणि वैष्णवी भड आणि कोमल बांदुरकर ह्या तृतीय आल्या. नाट्य स्पर्धेतील मोनोलॉग या प्रकारात प्रथम क्रमांक शिवराज गिते, द्वितीय क्रमांक मानसी सोनवणे, तसेच प्रोत्साहनपर बक्षीस केशव मिश्रा याला देण्यात आले व मीमिक्री या प्रकारात शिवराज गिते प्रथम आला.
त्याचप्रमाणे मिसमॅच या स्पर्धेत मनाली सोनटक्के प्रथम व पूनम टेकाळे द्वितीय आली. क्विझ स्पर्धेत पार्थ खंडेलवाल, ऋत्विक टाले आणि राम चांडक यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविले. निबंध स्पर्धेत आदित्य शिंदे, श्रुती निचट आणि संध्या सावंत यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविले व अपूर्वा मल्लेकर हिला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. फिश पोंड सदर स्पर्धा आभासी पद्धतीने पार पडल्या असून, विद्यार्थ्यांनी घरी बसून आनंद घेतला. या स्नेसंमेलन कार्यक्रमास सुप्रसिद्ध सिनेअभिनेते अमित्रियान यांनी हजेरी लावून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला, तसेच या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व प्राध्यापक वृंदांचा सहभाग लाभला. समारोपीय कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. एस. पी. लांबे, डॉ. आर. आर. शेळके, डॉ. प्रज्ञा कदम, प्रा. वीरेंद्र ठाकूर यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा जुमणाके हिने, तर आभार प्रदर्शन आदित्य कानडे याने केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.