शिर्ला (अंधारे) : येथील सोमपुरी महाराज संस्थानच्या परिसरात सुरू असलेल्या गुरुचरित्र ग्रंथ पारायणाची सांगता झाली. यानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने भाविकांना विविध आध्यात्मिक पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष राजू कोकाटे व महिला समितीच्या सहसचिव मीराताई राऊत यांनी पारायणात भाग घेऊन ज्येष्ठ नागरिक संघाचा सहभाग नोंदविला. पारायण सोहळ्याचे व्यासपीठ नेतृत्व रामभाऊ महाराज कठाडे यांनी केले. देवीदास अंधारे, अशोक महाराज ठाकूर, विनोद पातुरे, प्रभावती कोकाटे, सुमनबाई कोकाटे, हिरुबाई वरणकार, सुमित्राबाई अंधारे, आशाबाई कोकाटे, बेबीबाई पातुरे, सरिता गावंडे, सोनाली लांडे, गंगाबाई वसतकार यांनी पारायणात भाग घेतला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण अंधारे, भागवताचार्य महादेव महाराज निमकंडे, जगन्नाथ महाराज अमानकर, गुलाबराव कोकाटे, मोतीराम बोचरे, वीरपिता काशीराम निमकंडे, दामोदर अंधारे, श्रीकृष्ण अंधारे, रामकृष्ण खंडारे, हरिभाऊ कठाळे, अरुण अंधारे, अरुण कोकाटे, गोपाल अंधारे, रमेश लांडे, धोंडू बळकार, प्रशांत राऊत, मनोहर वसतकार, देवीदास निमकंडे, रामेश्वर अंधारे, अनंता अंधारे यांची उपस्थिती होती. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कोरोना सुरक्षा नियमावलीचे यावेळी पालन करण्यात आले.