बोरगाव मंजू : राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत यशदा पुणे व जिल्हा परिषद अकोला, पंचायत राज प्रशिक्षण केंद्र अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला तालुक्यातील महिला ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण दि.१० आगस्टपासून बोरगाव मंजुतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा समारोप समारोप शुक्रवारी झाला.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या नीता गवई, पं. स. सदस्य भरत बोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली पवार यांनी भेट देऊन महिला पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. महिलांना प्रशस्तिपत्रासह वाचन साहित्याचे वितरण करण्यात आले. तीन दिवसीय क्रांतिज्योती प्रशिक्षण अकोला जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, पंचायत राज प्रशिक्षण केंद्र अमरावती प्राचार्य शीतल मेटकर, निर्देशक नागसेन बागडे, पंचायत ग्रामविकास अधिकारी गुणवंत वढनकर यांच्या मार्गदर्शनात यशदा पुणेचे प्रशिक्षक संतोष चक्रनारायण, मनीषा राऊत, शिवशंकर डीक्कर, रुपाली वाकोडे यांनी दिले.
-------------------
या गावातील महिला पदाधिकाऱ्यांचा सहभाग
तीन दिवसीय प्रशिक्षणात ग्रामपंचायतीमधील सभा, समित्या, निधी, महिला योजना, व्यक्तिमत्व विकास, महिलांची यशोगाथा, मातृत्व पंचायत, ७३व्या घटना दुरुस्तीनंतर झालेले बदल, सापशिडी, गाणे, खेळ, या माध्यमातून अकोला तालुक्यातील दहीगाव गावंडे, बोरगाव खुर्द, पातूर नदापूर, दोडकी, कोळबी ,पैलपाडा, कुरणखेड, सांगळूद बु. या ग्रामपंचायतमधील महिला पदाधिकाऱ्यांना क्षमता बांधणीचे प्रशिक्षण दिले.