वार्ड नंबर पाच मधील हनुमान मंदिराला लागून असलेल्या पहिल्या गल्ली मध्ये पक्का रस्ता नव्हता. त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याची जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनीता गोरे यांनी पाहणी करून सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकामासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे प्रयत्न केल्याने रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर या रस्त्याचे काम सुरू झाले असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. सोमवारी ग्रामपंचायतचे सरपंच वाजिद खान, उपसरपंच संध्याताई भास्कर डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष नासीर खान, माजी सरपंच पती एजाज खान, माजी पंचायत समिती सदस्य मंजूर शाह, डॉ. प्रदीप पाटील, हाजी रईस खान, नय्युम मुल्लाजी, अहेफाज खान, हनीफ कुरेशी, जावेद खान, ग्रामसेवक किशोर वाकोडे, शिवसेना युवा नेते शहेजाद खान, सय्यद अकिल, पत्रकार रिझवान खान, संतोष गव्हाळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ हजर होते.
दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण काम प्रगतीपथावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 4:18 AM