पारस : बाळापूर तालुक्यातील पारस येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या संच क्रमांक ३ व ३ या दोन्ही संचांमध्ये शुक्रवारी व शनिवारी सलग दोनदा आग लागून लाखो रुपयाचे नूकसान झाले असून, प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष मनीष तिवारी यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितिन राउत यांच्यासह व्यवस्थापकीय संचालक संजय खंडारे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. पारस औष्णीक विद्यूत प्रकल्पात सातत्याने आगीच्या घटना घडत असून प्रभारी अधिक्षक अभियंता सचिन भगेवार यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळेच आगीच्या घटना घडत असून त्यांचेकडील प्रभार त्वरीत काढून घेऊन आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करणयाची मागणी निवेदनातून केली आहे. पारस औष्णीक प्रकल्पातील कोल मिल मधे लागलेल्या आगीबाबत मूख्य अभियंता यांनी कोणतीही जबाबदारी निश्चीत केली नाही. आग लागण्याच्या घटना कंत्राटदाराच्या फायद्याची असल्याचे बोलले जात आहे. कार्यकारी अभियंता सचिन भगेवार यांच्याकडे एकूण तिन पदाचा प्रभार असतानाही व अन्य अनुभवी अधिकारी उपलब्ध असताना अधिक्षक अभीयंता पदाचा प्रभार भगेवार यांना देण्यामागील हेतूची चौकशी होणे गरजेचे आहे, असे निवेदनात म्हटले आहे. कोल मीलमधे लागलेल्या आगीत एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, शेकडो कबुतरे मॄत्यूमूखी पडली आहेत. या घटनेबाबत औद्योगिक सूरक्षा व आरोग्य संचालनालयाने ताशेरे ओढले असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन लाख रुपये दंड केला आहे. दंडाची रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडून वसून करण्याची मागणी सह अधिक्षक अभियंता पदाचा प्रभार त्वरीत सक्षम व जेष्ठ अनूभवी अधिकाऱ्याकडे देण्यात यावा तसेच गत दहा वर्षापासून एकाच ठीकाणी ठाण मांडून बसलेले कार्यरत कार्यकारी अभियंता यांची बदली करण्यासह आगीच्या घटनेबाबत जबाबदार धरुन कठोर कारवाईची मागणी निवेदनातून केली आहे.
सचिन भगेवार दहा वर्षांपासून एकाच ठिकाणी
सचिन भगेवार हे कार्यकारी हे उपकार्यकारी अभियंता म्हणून २०१० रुजू झाले होते. कार्यकारी अभियंता पर्यंतच्या दोन पदोन्नतीसह ते सलग दहा वर्षे एकाच ठीकाणी ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्याकडे एकून तिन विभागाचा अतिरिक्त प्रभार असतांनाही अधिक्षक अभियंता संचालन हा महत्वाचा प्रभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे. बदली होऊनही ते येथेच कार्यरत आहेत अशीचर्चा पूर्ण पारस प्रकल्पात आहे.