अनंत वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी कर्जमाफीचे वेगवेगळे निकष यामुळे व दररोज शासन निर्णय बदलून त्याच्या अंमलबजावणीसाठी बँकांकडे येणाºया निर्देशामुळे २००९ ते २०१६ पर्यंत किती पात्र लाभार्थी कर्जमाफीत बसतात, हे पुढील काळच ठरवणार आहे. शासनाने जाहीर केलेल्या तातडीची १० हजार रुपयांची मदत तालुक्यातील केवळ १२ शेतकºयांना मिळाली आहे.शेतकºयांना कर्जमाफीसाठी निकषांमुळे शासन व बँकांची गोंधळाची झालेली स्थिती यामुळे शासन निर्णय थेट बँकांपर्यंत अद्याप पोहोचलाच नाही. याबाबत वरिष्ठ पातळीवरून केवळ चर्चा सुरू आहे. कर्जमाफीचा लाभ कुठल्या शेतकºयांना मिळावा, पुनर्गठनाचा पूर्वी लाभ घेणाºयांना कर्जमाफीचा लाभ देऊन दुहेरी लाभ पुनर्गठनाच्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्याबाबत संभ्रम होत आहे.तालुक्यात २०१६-१७ मध्ये १,२७७ शेतकºयांना ८ कोटी ११ लाख ५८ हजारांचे पीक कर्जाचे पुनर्गठन केले होते. यातील किती व कोणते शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरतात, तालुक्यातील ४२ सेवा सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून थकबाकी पीक कर्ज ३० जून २०१६ पर्यंत ७२४ अल्पभूधारक शेतकरी, रक्कम १ कोटी ८३ लाख ५७ हजार, पाच एकरांपर्यंत ४५७ रक्कम २ कोटी १८ लाख ५१ हजार, पाच एकरांवरील २०० शेतकरी रक्कम १ कोटी ८३ लाख ५८ हजार एकूण १३८० शेतकरी, ५ कोटी ८५ लाख ७३ हजार रुपये. मुदती कर्ज थकबाकीदार ८८४ शेतकरी, कर्जदार रक्कम ४ कोटी ४४ लाख ३९ हजार अशी आहे. राज्य शासनाने पूर्वी २०१३ नंतर थकबाकीदार कर्जदार शेतकºयांना लाभ देण्याचा आदेश दिले होते. आता २००९ ते २०१६ पर्यंतच्या सर्व थकबाकीदारांना कर्जमाफीत समाविष्ट करण्यासाठी निर्देश दिले जात आहेत. त्यादृष्टीने तालुक्यातील स्टेट बँक, सेंट्रल बँक, विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, युको बँक या पाचही बँकांना कर्जदार (थकबाकीदार) शेतकºयांना शासनाचे निकष, पात्रतेत किती शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळतो, याबाबत वेगवेगळे शासन निर्देश यामुळे बँकेचे अधिकारी संभ्रमात आहेत. अद्याप कुठलीही बँक माफी मिळालेल्यांची यादी प्रसिद्ध करू शकली नाही.बँकांना आदेशाची प्रतीक्षाशेतकºयांना कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सरकार लाभार्थीची व्याप्ती वाढवतच आहे. त्यामुळे, बँकांना कर्जमाफी कुणाला द्यायची,याविषयी आदेशाची प्रतीक्षा आहे. शासनाचे निर्णय सतत बदलत असल्याने बँकाही संभ्रमात असल्याचे चित्र बाळापूर तालुक्यात आहे. तसेच तातडीची मदत शासनाने जाहीर केली असली तरी तालुक्यातील १२ शेतकºयांनाच ही मदत देण्यात आली.शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शासनाने निकष, पात्रतेत वेळ व पैसा न घालवता कर्जदार ते थकीत असो की नियमित कर्जदार पुनर्गठन यांना वंचित न ठेवता द्यावी, कुठलाही भेदभाव न करता देण्यात यावी.- महेश चव्हाण, कवठा (बहादुरा)थकीत, नियमित कर्जदार भेदभाव न करता कुठलीही निकष पात्रता न ठेवता सर्वांना सारख्या प्रमाणात कर्जमाफीचा लाभ मिळावा.- अशोक उमाळे, बाळापूर.
कर्जमाफीबाबत शेतक-यांमध्ये संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 2:06 AM
बाळापूर : राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी कर्जमाफीचे वेगवेगळे निकष यामुळे व दररोज शासन निर्णय बदलून त्याच्या अंमलबजावणीसाठी बँकांकडे येणाºया निर्देशामुळे २००९ ते २०१६ पर्यंत किती पात्र लाभार्थी कर्जमाफीत बसतात, हे पुढील काळच ठरवणार आहे.
ठळक मुद्दे१२ शेतक-यांना प्रत्येकी १० हजारांची मदत कर्जमाफीबाबत शासनाचे वेळोवेळी वेगवेगळे निर्देश