पैलपाडा, पातूर नंदापूर, कुरणखेड, रामगाव, अकोला आदी ठिकाणांवरून ऑनलाइन नोंदणी केलेले नागरिक बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास या ठिकाणी आले; परंतु या ठिकाणी एकही वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते. वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने कर्मचाऱ्यांवर कोणाचेच नियंत्रण नव्हते. आलेल्या नागरिकांना त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. एकमेकांकडे टोलवाटोलवी करत होते. आम्हाला माहिती नाही, कोणी म्हणत होते, माझ्याकडे नाही, तिकडे जा, अशी टोलवाटोलवी सुरू होती. काही कर्मचाऱ्यांना तर प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण शिबिर आयोजित केल्याचीच माहिती नव्हती. अखेर ११ वाजता लसीकरणाला सुरुवात झाली. एकीकडे शासन कोरोनाला अटकाव करण्यासाठी लसीकरणाबाबत जनजागृती करत लोकांना लस घेण्याबाबत प्रोत्साहित करीत आहे तर आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी मात्र, याबाबत उदासीन आहेत. आरोग्य विभाग लसीकरण कार्यक्रमाबाबत किती गंभीर आहे, हे येथील प्रकारावरून स्पष्ट होते.
फोटो:
१८ वर्षांवरील लसीकरण सुरू करण्यात आले. त्यात थोडा नियोजनाचा अभाव असू शकतो. आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची निष्काळजी खपवून घेतली जाणार नाही. लसीकरण यशस्वी करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.
-डॉ. जगदीश बनसोडे, तालुका वैद्यकीय अधिकारी, अकोला
कुरणखेड प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये माझ्या पत्नीला लसीकरणासाठी सकाळी ९ वाजता घेऊन आलो; परंतु येथे लसीकरणाची कोणतीही व्यवस्था नव्हती. वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणूक देण्यात येते. नागरिकांना तासनतास ताटकळत बसावे लागले.
-प्रदीप देशमुख, पैलपाडा