काँग्रेसची समिती करणार दुष्काळाची पाहणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 03:37 PM2019-05-13T15:37:47+5:302019-05-13T15:40:02+5:30

अकोला : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी विदर्भातील दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी काँग्रेस आमदार व पदाधिकाऱ्यांची एक समितीच नेमली आहे.

 Congress Committee will inspect drought! | काँग्रेसची समिती करणार दुष्काळाची पाहणी!

काँग्रेसची समिती करणार दुष्काळाची पाहणी!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी विदर्भातील दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी काँग्रेस आमदार व पदाधिकाऱ्यांची एक समितीच नेमली आहे. विशेष म्हणजे, या समितीला दौरा केल्यानंतर आपला अहवालही प्रदेश काँग्रेसकडे सादर करायचा आहे. ही समिती सोमवार, १३ मेपासून विदर्भात दौरे करणार असून, बुलडाण्यात १३ मे, अकोल्यात १४ मे तर वाशिममध्ये १५ मे रोजी प्रत्यक्ष शेतकºयांशी संवाद साधणार आहे. राज्याच्या बहुतांश भागात तीव्र स्वरूपाची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाय योजण्यात राज्य सरकार कमी पडत आहे, असा ठपका ठेवत काँग्रेसने सरकारची कोंडी करण्याची रणनीती या निमित्ताने आखली आहे.
गेली दोन महिने सत्ताधाºयांसह विरोधकही लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. आचारसंहिताही लागू आहे. यामुळे दुष्काळी परिस्थिती निवारणाकडे काहीअंशी दुर्लक्ष झाले. राज्यातील काही भागातील दुष्काळी चित्र चिंताजनक झाले आहे.
सरकारचे मंत्री घोषणा करीत आहेत; मात्र प्रत्यक्षात उपाययोजना होताना दिसत नाही. ही बाब हेरून काँग्रेसने दुष्काळाच्या मुद्यावरून सरकारची कोंडी करण्याची तयारी चालविली आहे. पक्षातर्फे आता दुष्काळी भागाचे दौरे केले जाणार आहेत. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी विदर्भासाठी एक समिती नेमली असून, ही समिती तालुक्यातील दुष्काळी भागांना भेट देईल. या समितीच्या दौºयात संबंधित जिल्ह्यातील अध्यक्षांनाही सहभागी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती समिती समन्वयक अतुल लोंढे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
अशी आहे समिती
विदर्भाची समिती विधानसभेतील उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली आहे. यामध्ये माजी मंत्री वसंत पुरके, राजेंद्र मुळक, आ. वीरेंद्र जगताप, रणजित कांबळे, सुनील केदार, राहुल बोंद्रे, अमर काळे, नतिकोद्दीन खतीब, अमित झनक व समिती समन्वयक म्हणून प्रवक्ते अतुल लोंढे यांचा समावेश आहे.
या मुद्यांवर असेल ‘फोकस’!
काँग्रेसची समिती दुष्काळी दौरा करताना नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची परिस्थिती समजून घेईल.
जनावरांच्या पाण्याची व चाºयाची परिस्थिती पाहील.
चारा छावण्यांना भेटी देईल.
जनतेसाठी रोजगार उपलब्ध आहेत का, याची पाहणी करील.
सर्व पाहणीनंतर समिती जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन उपाययोजना करण्याची मागणी करेल.

 

Web Title:  Congress Committee will inspect drought!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.