शहरातील शिवाजी चौक येथून सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली. केंद्र सरकारने चुकीचे निर्णय घेल्याने इंधन दरवाढ झाल्याचा आरोप काँग्रेसने केला. या वेळी प्रामुख्याने नगराध्यक्ष प्रा. संजय बोडखे, तालुकाध्यक्ष प्रशांत पाचडे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रमोद चोरे, जिल्हा महासचिव मनोज खंडारे, माजी नगरसेवक संजय आठवले, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रा. निनाद मानकर, संजय भावे, बूथ समन्वयक प्रतीक गोरे, वैभव पाचडे, विकास देशमुख, माजी जि.प. सदस्य गजानन डाफे, हिरालाल कासदेकर, अफरोज खान आदींसह काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (फोटो)
------------
शहरातील पेट्रोलपंपावर जाऊन घोषणाबाजी
देशात प्रचंड महागाई वाढल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. शहरातील पेट्रोलपंपावर जाऊनसुद्धा मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.