- विजय शिंदे
अकोट: अकोट तालुक्यातील मोहाळा येथील हत्याकांड प्रकरणात काँग्रेस पराभूत उमेदवार हिदायत पटेल यांच्या सह १०जणाविरूध्द गुन्हा दाखल करावा लागला आहे. प्रारंभी या घटनेला लोकसभा निवडणुकीचा राजकिय रंग देण्याचा प्रयत्न झाला,पंरतु फिर्यादीने हिदायत पटेलसह १०जणांनी लहान मुलांच्या भांडणावरून ही घटना घडल्याचे कारण पोलीसांसमोर दिलेल्या बयाणात नमुद केले आहे. ही घटना राजकीय वादातुन घडल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. या घटनामुळे भाजपा,काँग्रेसचे मंडळीसह वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना सुचेनासे झाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मोहाळा येथे २४ मे रोजी सायंकाळच्या दरम्यान भाजपाच्या अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी मतीनखाँ शेरखाँ पटेल (48) यांच्यासोबत गावातीलच काँग्रेस पक्षाशी संबंधित पटेल गटाच्या लोकांचा वादविवाद झाला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा संदर्भ या घटनेच्या मागे असल्याने फिर्यादीसह उपस्थितांनी या वादाला लोकसभा निवडणुकीतून मतदानाची किनार असल्यानेच पटेल गटाच्या लोकांनी एकत्रितपणे जमा होऊन मतीनखाँ शेरखाँ याचेवर हल्ला चढविला. या हल्लात मतीन पटेल यांचा मृत्यू झाला. तर या घटनेत मुमताज पटेल मियाँ खाँ पटेल (55) हा गंभीररित्या जखमी झाल्याने अकोला येथे उपचारार्थ पाठविण्यात आल्याची घटनासमोर आली होती.. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे, ठाणेदार ठाणेदार ज्ञानोबा फड, पोलीस उपनिरीक्षक शहाजी रुपनर यांनी उशिरा रात्रीपर्यंत या घटनेमागील सत्यकारण उलगडण्याचा प्रयत्न केला असता या घटनेतील फिर्यादी मुमताज खाँ याने पोलिसांना दिलेल्या जबानी रिपोर्टमध्ये या घटनेमागे लहान मुलांच्या भांडणाचे कारण असून या कारणावरून हिदायत पटेलसह दहा जणांनी वादविवाद करून शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या उद्देशाने घरात घुसून मारहाण केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे या तक्रारीवरून आरोपी हिदायतउल्ला खाँ बरकतउल्ला खाँ पटेल, इम्रानउल्ला खाँ पटेल, शफीकउल्लाखाँ पटेल, फारुकउल्लाखाँ पटेल, शोएबउल्लाखाँ पटेल, फरीदउल्लाखाँ पटेल, रहेमतउल्लाखाँ पटेल, रफतउल्लाखाँ पटेल, इस्ताकउल्लाखाँ पटेल, अतहरउल्लाखाँ पटेल यांचे विरुद्ध भांदवी च्या ३०२, ३०७,२९४, ४५२,१४३, १४७,१४८,१४९ कलमान्वे अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले. मोहाळा गावात घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत होता. घटनेची माहिती मिळताच जिपोअ राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली आकोट ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर पोहचून गावातील परिस्थिती नियंत्रणात आणली.अन्यथा मोहाळा येथील परिस्थिती आटोक्याबाहेर गेली असती, तर त्यांची झळ इतर ठिकाणी पोहचली असती असे वातावरण निर्माण झाले होते. गावात शांतता असुन, पोलीस ताफा तैनात आहे.