राफेल घोटाळा विरोधात काँग्रेसचा ‘एल्गार’; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिले धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:25 AM2018-09-15T10:25:27+5:302018-09-15T10:25:54+5:30
अकोला: राफेल घोटाळा विरोधात ‘एल्गार’ पुकारित घोटाळ्याची सर्वंकष चौकशी करण्याच्या मागणीसाठी जिल्हा काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.
अकोला: राफेल घोटाळा विरोधात ‘एल्गार’ पुकारित घोटाळ्याची सर्वंकष चौकशी करण्याच्या मागणीसाठी जिल्हा काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.
राफेल घोटाळ्यात सरकारने खासगी कंपनीमार्फत नियम धाब्यावर बसवून खरेदी केली व गोपनीयतेच्या नावावर खरेदीची किंमत लपवून, ४१ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप करीत, सरकारने खरेदीची किंमत जाहीर करून, घोटाळ्याची सर्वंकष चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी अकोला जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानाकडे सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, माजी आमदार तथा काँग्रेसचे महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके, माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, नातिकोद्दीन खतीब, माजी महापौर मदन भरगड, साजिदखान पठाण, डॉ. सुभाषचंद्र कोरपे, डॉ. संजीवनी बिहाडे, अविनाश देशमुख, रमाकांत खेतान, वामनराव थोटांगे, सय्यद जहागीर, प्रशांत पाचडे, सैयद यासीन, कपिल रावदेव, विजय शर्मा, पराग कांबळे, अनंत बगाडे, सत्यप्रकाश घाटोळे, प्रल्हाद ढोरे, देवीदास नेमाडे, महादेव हुरपडे, अंशुमन देशमुख, सीमा ठाकरे, रजिया पटेल, सुषमा निचळ, विजया राजपूत, पुष्पा देशमुख, संगीता आत्राम, डॉ. मोहन रहाटे, सैयद जफर सै. हसन, रहेमान बाबू, अनिस एकबाल, साधना गावंडे, तशवर पटेल, अजय ताथोड, रवी शिंदे, दिलीप खत्री, अॅड. सुरेश ढाकोलकर, संजय मेश्रामकर, डॉ. मनोहर दांदळे, मोहम्मद इरफान, मशरफ पठाण, नरेंद्र देशमुख यांच्यासह काँग्रेसचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.