अकोला- महिलांना राजकीय आरक्षण देण्यासोबतच त्यांना राजकीय क्षेत्रात योग्य प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उषा विरक यांना उमेदवारी देण्याचा निर्णयसुद्धा याच धोरणानुसार घेतला असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांनी सांगितले. काँग्रेस, पीरिपा (कवाडे) या पक्षाच्या अकोला पश्चिम मतदारसंघातील उमेदवार उषा विरक यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. नगरसेविका म्हणून उषा विरक यांनी केलेली विकासाची कामे मतदारांपुढे आहेत. एकीकडे निष्क्रिय लोकप्रतिनिधी आणि दुसरीकडे विकासाची दृष्टी असलेली महिला उमेदवार आहे.विकासासाठी जनतेने विरक यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन वासनिक यांनी केले. या कार्यक्रमाला माजीमंत्री अजहर हुसेन, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, माजी आमदार बबनराव चौधरी, महानगराध्यक्ष मदन भरगड, रमाकांत खेतान, अनिल साळवी, अर्जुन थानवी आदींसह असिफ पटेल, संजय मेश्रामकर, डॉ. मोहन खरे, तश्वर पटेल, शेख हनिफभाई, देवीदास सोनोने, जितेंद्र बराठे, कैलास देशमुख, बाबा पटेल, इलियास, जावेद पटेल यांची उपस्थिती होती.
महिलांना काँग्रेसनेच न्याय दिला- मुकुल वासनिक
By admin | Published: October 09, 2014 1:23 AM