अकोला: काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पंधरा वर्षांच्या कालावधीत शहरी भागासह ग्रामीण भागात आठ ते दहा तास भारनियमन होते. शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा देण्याच्या नावाखाली बॅरेज व विविध विकास कामांचे केवळ उद्घाटन करून वर्षानुवर्षे विकास कामांचे गुºहाळ लांबवले. व्यापाराचे मोठे केंद्र असणाºया अकोला जिल्ह्याच्या विकासाकडे साफ दुर्लक्ष करणाºया काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट आघाडीने महाराष्ट्राचे पुरते वाटोळे केल्याचा घणाघाती हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी जाहिर सभेत केला. २०१४ पासून केंद्रात व राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतरच खºया अर्थाने अकोला जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाल्याचे पंतप्रधान मोदी यांनी ठासून सांगितले.भाजप-शिवसेना महायुतीच्यावतीने निवडणुक लढविणाºया उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, वि.दा.सावरकर यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊनच आम्ही ‘सबका साथ,सबका विकास’चा मुलमंत्र घेऊन जनतेसमोर आलो. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मागील पाच वर्षांत सर्वसामान्य जनतेसाठी विविध कल्याणकारी योजनांची प्रामाणीकपणे अंमलबजावणी केली. त्याचे सकारात्मक परिणाम सर्वसामान्य जनतेला दिसत असल्यामुळेच आम्ही तुमच्यासमोर विकास कामांच्या बळावर पुन्हा एकदा आशीर्वाद मागण्यासाठी आलो असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. २०१४ मध्ये केंद्रातील सत्ता मिळाल्यानंतर उण्यापुºया पाच वर्षांच्या कार्यकाळात भाजपने गोरगरीबांना डोळ््यासमोर ठेऊन कल्याणकारी योजना राबवल्या.