प्रियंका गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसची अकोल्यात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 17:58 IST2019-07-20T17:55:49+5:302019-07-20T17:58:05+5:30
काँग्रेसच्यावतीने शनिवारी सीटी कोतवाली चौकात प्रदेश काँग्रेसचे महासचिव व माजी महापौर मदन भरगड यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली.

प्रियंका गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसची अकोल्यात निदर्शने
अकोला : अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी बेकायदेशीर अटक केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने शनिवारी सीटी कोतवाली चौकात प्रदेश काँग्रेसचे महासचिव व माजी महापौर मदन भरगड यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली.
उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून गोळीबार करून १० जणांची हत्या करण्यात आली. या हिंसाचारात बळी गेलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी सोनभद्र येथे जात असताना काँग्रेसच्या सरचिटणीस तथा उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी यांना वाराणसी पोलिसांनी बेकायदेशीर अटक केली. याघटनेचे अकोल्यात शनिवारी तीव्र पडसाद उमटले. दुपारी १२ वाजताचे सुमारास सिटी कोतवाली समोर भरगड यांच्या नेतृत्वात शेकडो कॉंग्रेस कार्यकत्यांनी घोषणा बाजी करत भाजपच्या दडपशाहीचा निषेध केला. प्रियंका गांधी यांना अटक करणे म्हणजे लोकशाहीचा खुन असल्याचे प्रतिपादन प्रदेश कॉंग्रेसचे महासचिव व माजी महापौर मदन भरगड यांनी केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ्र घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. यावेळी विजय शर्मा, राजेन्द्र चितलांगे, गणेश कटारे, राजेश पाटील, मनिष नारायणे, देविदास सोनोने, डॉ. मोहन खरे, डॉ. सुधाकर कोपेकर,डॉ. प्रेमशंकर तिवारी, आकाश शिरसाट, अंकुश गावंडे,भगवान बोयत, विजया राजपुत, सिमा ठाकरे ,वर्षा बडगुजर, नवनित राजपुत,रफीउल्ला खान, धनराज सत्याल, सैयद जफर सै.हसन, शे. नावेद, बी. एस. इंगळे, अमोल सातपुते, शे. गनी, शेख फिरोज चांद रंगीवाले , डॉ. मो. रफीक लाखाणी, लक्ष्मण भिमकर, हाजी अशरफ गाजी, श्रीकांत धनस्कार, आकोश सायखेडे, मनोहरराव गव्हाले, माधुरी काळबागे, नासीर शाह महेबुब शाह, शे. जावेद, इस्माईल ठेकेदार, अभिषेक भरगड, राजु शाहु, गोपाल शर्मा, कुंदन गुप्ता, अजय रावनकर, अम्माद लोधी, हरीश कटारिया उपस्थित होते.