अकोला : केंद्र सरकारने पारीत केलेल्या तीन कृषी कायद्यांचा विरोध करीत, जिल्हा काॅंग्रेसच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले असून, शेतकरी विरोधी तीन कृषिविषयक काळ्या कायद्याविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यात आला.
केंद्रातील सरकारने पारीत केलेल्या तीन कृषी विषयक काळ्या कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित, शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारने तातडीने मंजूर कराव्या, अशी मागणी करीत जिल्हा काॅंग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांकडे सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, माजी आमदार अजहर हुसेन, माजी आमदार नातिकोद्दीन खतीब, प्रकाश तायडे, रमाकांत खेतान, साजीदखान पठाण, डाॅ.सुभाषचंद्र कोरपे, अशोक अमानकर, संजय बोडखे, प्रदीप वखारिया, महेश गणगणे, हेमंत देशमुख, विलास गोतमारे, विजय शर्मा, तश्वर पटेल, पंकज देशमुख, पुष्पा देशमुख, प्रतिभा नागलकर, ॲड. सुरेश ढाकोलकर, राजू नाइक, राजेश मते पाटील, प्रकाश देशमुख, कपील रावदेव, चंद्रकांत सावजी, मो.युसूफ, अंशुमन देशमुख, अशरफ पठाण, महेंद्र गवई, नितीन ताकवाले, दिनेश खोब्रागडे, सागर कावरे, गजानन महल्ले यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.