अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आल्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा निषेध करीत, अकोला शहर काॅंग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
ओबीसी आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ओबीसींची आकडेवारी मागितली होती. परंतु केंद्र सरकारकडून ती आकडेवारी देण्यात आली नसल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द करण्यात आले. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला केंद्र सरकार आणि राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेता तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप करीत, केंद्र सरकाच्या ओबीसी विरोधी धोरणाचा शहर काॅंग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला व निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने ओबीसींचे आरक्षण परत मिळवून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलनात काॅंग्रेसचे अकोला शहर अध्यक्ष माजी आमदार बबनराव चौधरी, मनपा विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण, प्रकाश तायडे, निखिलेश दिवेकर, नगरसेवक मोहम्मद इरफान, पराग कांबळे, राजेश भारती, राजेश राऊत, प्रदीप वखारिया, अविनाश देशमुख, हेमंत देशमुख, जमीर बर्तनवाले, प्रशांत वानखडे, मोहम्मद युसुफ, दिनेश खोब्रागडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
.................फोटो..........................