केंद्रातील मोदी शासनाने कृषी व शेतकऱ्यांसंदर्भात पारित केलेल्या तीन कृषीविषयक कायद्याच्या विरोधात देशातील पंजाब, हरियाणा, दिल्ली व इतर देशातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास तालुका काँग्रेस कमिटीने जाहीर पाठिंबा देऊन त्यांच्या मागण्या मंजूर करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविले आहे.
देशातील शेतकरी दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये रस्त्यावर उतरून आपल्या हक्कासाठी लढा देत आहेत. त्यांच्या संपूर्ण मागण्या केंद्र शासनाने त्वरित मंजूर करावे. अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरून त्यांच्यासाठी आंदोलनाची भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी तालुका अध्यक्ष बाळासाहेब बाजाड, पंचायत समिती सभापती ऊर्मिला डाबेराव, पंचायत समिती सदस्य जया तायडे, बबन डाबेराव, बंडू डाखोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वासुदेव बोळे, प्रकाश वानरे, विनोद बंग, अखबर ठेकेदार, रोहित सोळंके, सुनील वानखडे, मोहम्मद शहाबुद्दिन, दीपक खंडारे, अमोल तातूरकर, वीर काकडे, भाऊसाहेब खांडेकर, जगदीश जोगळे, विजय राऊत, श्रीराम सोळंके, अनुप देशमुख ,नागोराव तायडे, सचिन तराळ, जगतराव बुटे उपस्थित होते.
फोटो: