अकोला: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. २०१४ मधील निवडणुकीत पक्षाचे उमेदवार हिदायत पटेल यांना दुसºया क्रमांकाची मते मिळाली होती. यंदा त्यामध्ये घसरण होऊन तिसºया क्रमांकाची मते मिळाली. पक्षाचा पराभव आणि संघटना बांधणीवर चर्चा करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश महासचिव मदन भरगड, विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी क ाँग्रेसचे शहर अध्यक्ष बबनराव चौधरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.सतराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्यावतीने हिदायत पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. दुसरीकडे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत होणार असल्याने निवडणुकीत रंगत आली होती. दोन्ही उमेदवार भाजपच्या संजय धोत्रे यांच्यासह एक मेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे असले तरी दुसºया क्रमांकाची मते कोणाला मिळतात, यावर काँग्रेस आणि वंचित आघाडीत रस्सीखेच सुरू होती. २०१४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत काँगे्रसचे हिदायत पटेल यांना दुसºया क्रमांकाची मते मिळाली होती. त्यावेळी अॅड. आंबेडकर तिसºया क्रमांकावर होते. यंदा अॅड. आंबेडकर यांना दुसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसची पीछेहाट होऊन तिसºया क्रमांकाची मते मिळाली. ही बाब लक्षात घेता निवडणुकीतील पराभवाचे चिंतन करून त्यावर तोडगा काढण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश महासचिव मदन भरगड, विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी पत्राद्वारे क ाँग्रेसचे शहर अध्यक्ष बबनराव चौधरी यांच्याकडे केली आहे. या पत्राची दखल घेऊन बबनराव चौधरी बैठकीचे कधी आयोजन करतात, याकडे लक्ष लागले आहे.
काँग्रेसच्या मतांमध्ये घसरणलोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर भाजप उमेदवार संजय धोत्रे यांना ५ लाख ५४ हजार ४४४ मते मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकावर वंंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांना २ लाख ७८ हजार ८४८ मते मिळाली, तर काँग्रेसचे हिदायत पटेल यांना तिसºया क्रमांकाची २ लाख ५४ हजार ३७० मते मिळाली. काँग्रेसच्या बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेल्या मतांचा आढावा घेतल्या जाणार असल्याची माहिती आहे.लोकसभा निवडणुकीतील पराभवावर कारणमीमांसा करण्यासाठी गत आठवड्यात प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबईत पार पडली. त्या बैठकीला स्थानिक सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्याच विषयावर बैठक घेण्यासंदर्भात पत्र प्राप्त झाले असून, लवकरच बैठकीचे आयोजन केले जाईल.-बबनराव चौधरी, शहर अध्यक्ष काँग्रेस.