सत्ता मिळविण्यासाठी राज्यात काँग्रेसचे कार्यकर्ता प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 01:38 PM2019-02-23T13:38:40+5:302019-02-23T13:38:44+5:30

अकोला: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळविण्यासाठी राज्यात काँग्रेसने कार्यकर्ता प्रशिक्षण सुरू केले असून, अकोल्यातही २५० निवडक कार्यकर्त्यांना हे प्रशिक्षण शुक्रवारी देण्यात आले.

Congress worker training in the state to get power | सत्ता मिळविण्यासाठी राज्यात काँग्रेसचे कार्यकर्ता प्रशिक्षण

सत्ता मिळविण्यासाठी राज्यात काँग्रेसचे कार्यकर्ता प्रशिक्षण

googlenewsNext

अकोला: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळविण्यासाठी राज्यात काँग्रेसने कार्यकर्ता प्रशिक्षण सुरू केले असून, अकोल्यातही २५० निवडक कार्यकर्त्यांना हे प्रशिक्षण शुक्रवारी देण्यात आले. काँग्रेसचा इतिहास आणि सत्ताधाऱ्यांच्या फसव्या घोषणांची माहिती या प्रशिक्षणातून देण्यात आल्याची माहिती आमदार आणि राज्य कार्यकर्ता प्रशिक्षण प्रमुख रामहरी रूपनवर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी राज्यमंत्री प्रा. अजहर हुसेन, महानगराध्यक्ष बबन चौधरी, सुनील धाबेकर, हिदायत पटेल, मदन भरगड, नातिकोद्दीन खतीब, डॉ. संतोष कोरपे व साजीद खान प्रामुख्याने उपस्थित होते.
काँग्रेसचा जन्म आणि इतिहास उज्ज्वल आहे. त्या तुलनेत भाजपचा जन्म अलीकडचा आहे. काँग्रेसमध्ये नव्याने येणाºयांना शिस्त आणि इतिहासाची ओळख करून देण्यासाठी राहुल गांधींच्या पुढाकारात हे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर सर्वत्र घेतले जात आहे. आतापर्यंत ५० जिल्ह्यांत अशा प्रकारचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले असून, त्याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये होणार असल्याचा दावाही आमदार रूपनवर यांनी केला आहे. लीडरशीप इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून राज्यात चार प्रशिक्षक हे प्रशिक्षण देत आहेत. प्रशिक्षणात काँग्रेसने ६० वर्षांत केलेला विकास आणि बदल सांगितला जात असून, भाजप-मोदी सरकारच्या पाच वर्षांतील फसव्या बाबींवरही बोट ठेवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. लवकरच दुसºया टप्प्यात ब्लॉकवाइज प्रशिक्षण दिले जाणार आहे, असेही ते म्हणाले. काँग्रेसची विचारधारा सर्वधर्मसमभावाची आणि राष्ट्रीय एकात्मतेची आहे. सर्वसामान्य लोकांना या बाबी पटवून सांगण्याचे कार्य हे कार्यकर्ते करतील, असेही ते म्हणाले. पुलवामा प्रकरणी काँग्रेस भाजपाप्रमाणे राजकारण करणार नाही. देशाची एकजूटता दर्शविण्याची ही वेळ असल्याचेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात बोलले. लोकसभा निवडणूक संदर्भात विचारणा केली असता, समविचारी पक्षासोबत काँग्रेसची सकारात्मक बोलणी सुरू आहे. बोलणी अखेरच्या चरणात आहे, एवढेच सांगता येईल, असेही ते म्हणाले. त्यावेळी वामनराव थोटांगे, विजय शर्मा, दीपक बोरकर, कपिल रावदेव, अनंत बगाटे, तश्वर पटेल, संजय मेश्रामकर, डॉ. मोहन खरे, बबलू लोखंडे, आक्रोश सायखेडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

काँग्रेस कार्यकाळातील योजना नाव बदलून समोर आणल्या!

काँग्रेस कार्यकाळातील विविध योजनांचे नाव बदलून भाजपने त्या समोर आणल्यात. आधार, जीएसटी, आवास आदी अनेक योजनांवर काँग्रेसचे कार्य सुरू होते. सामान्य माणसाला महागाई छळणार नाही, याचा विचार करून काँग्रेसने या योजना आणल्या होत्या; मात्र भाजप-मोदी सरकारने केवळ थापा दिल्या. पाच वर्षांतील त्यांचे आश्वासन त्यांनीच पाहावे म्हणजे समजेल. या सर्व बाबींचादेखील प्रशिक्षणात समावेश असल्याचे येथे सांगितले गेले.

 

Web Title: Congress worker training in the state to get power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.