अकोला- पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात रविवारी कॉँग्रेसने अभिनव आंदोलन केले. बैलगाडीमध्ये दुचाकी नेत कॉँग्रेसने दरवाढीचा निषेध केला. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दुचाकी ढकलत नेत घोषणाबाजी केली. केंद्रातील मोदी सरकारने रेल्वे भाडेवाढीनंतर गॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझेलच्याही किमती वाढविल्या. लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने महागाई कमी करण्याचे दिलेले आश्वासन पाळले नाही, असा आरोप कॉँग्रेसकडून होत आहे. यापूर्वी कॉँग्रेसने रेल्वे भाडेवाढीच्या विरोधात ह्यरेल रोकोह्ण आंदोलन केले होते. दरम्यान, पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात जिल्हा कॉँग्रेस कमिटीतर्फे रविवारी शहरात आंदोलन करण्यात आले. टॉवर चौकातून रॅली काढण्यात आली. रॅलीत केंद्र सरकारने घेतलेल्या दरवाढीच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. रॅलीचा समारोप स्वराज्य भवनात झाला. आंदोलनामध्ये महासचिव राजेश भारती, उपमहापौर रफिक सिद्धीकी, महिला आघाडीच्या नेत्या स्वाती देशमुख, रुपाली ढेरे, उषा विरक, डॉ. झिशान हुसेन, महेश गणगणे, अफसर कुरेशी, दिलीप देशमुख, फैयाज खान, पराग कांबळे, अंशुमन देशमुख, सचिन शेजव, आकाश कवडे, पंकज देशमुख, किरण अवताडे, प्रणव चव्हाण, मनोज मिश्रा, राजेश राऊत, सोमेश डिगे, फरहान इर्शाद, मो. शारिक, मन्नान सिद्धीकी, अफसान अमिन, अमित इंगोले, संकेत साबळे, बंटी बोंडे, गजानन शिंदे, सोनू बल्लाळ, दिव्यंक केडिया, मनीष चिमणकर, गजानन शिरसाट, अभिषेक गवई, सागर कावरे, किरण अवताडे, राजू नाईक, शेख सज्जू आदी कार्यकर्ते दुचाकी घेऊन सहभागी झाले होते. महानगर कॉँग्रेसतर्फेही पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात रॅली काढण्यात आली. रॅली कॉँग्रेस जनसंपर्क कार्यालय, टिळक रोड, जुना कापड बाजार, जैन मंदिर, गांधी रोड मार्र्गे निघाली. रॅलीचा समारोप स्वराज्य भवनात करण्यात आला. आंदोलनात माजी मंत्री अजहर हुसेन, महानगराध्यक्ष मदन भरगड, बबनराव चौधरी, विष्णू मेहरे, अलियार खान, भारत सत्याल, गणेश कटारे, मनोज पाटील, रमेश मोहोकार, प्रदीप वखारिया, डॉ. सुभाष कोरपे, डॉ. सुधीर ढोणे, दिनेश शुक्ला, अफरोज लोधी, राजेश पाटील, हरीश कटारिया, प्रकाश दांडगे, गजानन दांगडे, राजू बखतेरिया, सचिन गिरी, सीमा ठाकरे, रफिक लाखानी, जाबीर खान, यासीन खान, रफिउल्ला खान, अभिषेक कोकाटे, सुरेश ढाकोलकर, अविनाश देशमुख, मनीष नारायणे, शेख बबलू, तपसु मानकीकर, कृष्णा मोरे, कैलास देशमुख, संजय मेश्रामकर, उमाकांत कवडे, उमेश इंगळे, डॉ. प्रेमशंकर तिवारी, अमोल सातपुते, विलास सातपुते, नंद मिश्रा, सुषमा निचळ, मधुर काळबागे, सिंधी भीमकर, लक्ष्मण भीमकर, अभिषेक भरगड, राजू चितलांगे आदी सहभागी झाले होते.
इंधन दरवाढीविरोधात कॉँग्रेसचे अभिनव आंदोलन
By admin | Published: July 07, 2014 12:35 AM