शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

मध्य प्रदेशातील शुटरचे टोळी युद्धातील आरोपींशी ‘कनेक्शन’

By admin | Published: June 27, 2014 1:32 AM

आकोट फैल परिसरात घडलेल्या टोळी युद्धातील आरोपींशी संबंध असल्याची माहिती

अकोला- मध्य प्रदेशातील कुख्यात आरोपी, शुटर वसीम खान अहेसान खानचे आकोट फैल परिसरात घडलेल्या टोळी युद्धातील आरोपींशी संबंध असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. टोळी युद्धात पिस्टलचा वापर करण्यात आला होता, हे येथे उल्लेखनीय. वसीमला अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री उशिरा गडंकी रोडवर अटक केली होती. आरोपीकडून एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले होते. गुन्हेगारी जगतावर वर्चस्व अबाधित राहण्यासाठी आकोट फैल परिसरात २00८ मध्ये दोन टोळ्यांमध्ये सशस्त्र संघर्ष झाला होता. या वेळी एकाची हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी २0१0 मध्ये पुन्हा सशस्त्र संघर्ष झाला. या दोन्ही गुन्ह्यात २५ पेक्षा जास्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या हत्याकांडातील सात आरोपींविरुद्ध मकोका अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी हे गांजा, ब्राऊन शुगर यासारख्या अवैध धद्यांमध्ये गुंतले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसीम खानला मध्य प्रदेशातून टोळी युद्धातील आरोपींनीच अकोल्यात आणले होते. वसीमच्या मदतीने मध्य प्रदेशातून गांजा, ब्राऊस शुगर अकोल्यात आणल्या जात होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस वसीमची कसून चौकशी करीत आहेत