अकोला: लॉकडाऊननंतर अनलॉक प्रकियेत जनजीवन पूर्वपदावर येत आहे. सध्या बांधकाम व्यावसाय उभारी मिळाली असून, शहरासह ग्रामीण भागात बांधकामे वाढलेली आहे. परिणामी, साहित्यांची मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे; पण गेल्या काही दिवसांपासून बांधकाम साहित्यांचे भाव वाढल्याने घराचे बांधकाम महाग झाले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यावसाय ठप्प पडले होते. कोरोनाचा फटका बांधकाम व्यावसायाला मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला. शहरी व ग्रामीण भागात सुरू असलेले बांधकाम थांबले होते. अनलॉक प्रक्रियेत बांधकाम व्यवसायाला उभारी मिळाल्याने पुन्हा कामे सुरू झाली. तसेच ग्रामीण भागात आवास योजनेंतर्गत अनेक कामे सुरू झाली. परिणामी बांधकाम साहित्यांची मागणी वाढली. साहित्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने बांधकाम साहित्यांचे दर वाढले आहेत.दर वाढल्याने बांधकाम क्षेत्र अडचणीत आले आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकांना माेठा फटका बसणार आहे. विकलेल्या घराच्या दरात वाढ करता येणार नाही. यामुळे दरवाढीचा फटका त्यांनाच सोसावा लागणार आहे. लॉकडाऊनपूर्वी व लॉकडाऊननंतर मिळणाऱ्या साहित्यांच्या दरात मोठी तफावत पहावयास मिळत आहे. याचा फटका सामान्यांना सोसावा लागत असून, घराचे स्वप्न महाग झाले आहे.
--------------------------------------------
बांधकाम साहित्याचे दर का वाढले?
तज्ज्ञांनी सांगिल्यानुसार, स्टीलचे भाव हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी व पुरवठ्यावर अवलंबून असतात. तसेच स्टीलची मागणी जास्त वाढल्याने तुटवडा निर्माण झाला आहे, परिणामी भाव वाढले आहेत. तसेच रेती घाटाचा लिलाव रखडल्याने रेतीची अवैध वाहतूक होत असून, रेतीमाफिया अव्वाच्या सव्वा भावाने विक्री करीत आहेत. वीट व गिट्टीचे भाव स्थिर असल्याचे चित्र आहे. येणाऱ्या काळात मागणी वाढल्यास भाव वाढणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
----------------------
कोरोनाच्या काळात माल पुरवठा येण्यात अडचण येत होती. साहित्य बाहेरगावाहून येणास अथडळा निर्माण झाला होता. परिणामी जादा भाडे देऊन साहित्य बोलावले जात होते. त्यामुळेच भाववाढ झाली.
- रमेश बोरेकर,
बांधकाम साहित्य विक्रेते, शिवर अकोला.