जावेद जकेरिया व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला महानगर अध्यक्ष रिजवाना आज़िज़ शेख यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
जुने शहरातील नागरिकांना वाहतुकीसाठी लाेखंडी पूल व दगडी पुलाचा पर्याय उपलब्ध आहे. डाबकी राेड भागातूनच गायगाव, हातरुण, उरळ, निंबा फाटा ते शेगाव तसेच संग्रामपूर तालुक्यात जाण्यासाठी प्रवासी वाहनांची माेठी वर्दळ सुरू राहते. डाबकी राेड अत्यंत अरुंद असल्याने याठिकाणी बाराही महिने वाहतूक काेंडीची समस्या आहे. आजराेली नागरिकांना जड वाहतुकीसाठी लाेखंडी पूल व दगडी पुलाचा पर्याय आहे. परंतु दाट लाेकवस्ती, वाहतुकीची काेंडी लक्षात घेता प्रभाग क्रमांक ११ मधील लक्कडगंज ते माेर्णा नदीकाठावरील प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत येणाऱ्या गुलजारपुरा भागाला जाेडण्यासाठी नदीत उड्डाणपूल उभारण्याची नितांत आवश्यकता आहे. यासाठी ४ ते ५ काेटींचा खर्च अपेक्षित असून, या पुलाचे निर्माण झाल्यास अकाेलेकरांना व्यवसाय करणे अधिक सुरळीत हाेइल, अशा आशयाचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय महासचिव जावेद जकेरिया यांनी दिले.